चरित्र

नदीकाठी असलेल्या गर्द वनराईत पर्णकुटी उभारून, किंवा बर्फाच्छादित पर्वतराजी हिमालयाच्या गुहेंत सर्वसंग परित्याग करून, अहोरात्र, अत्यंत कठिण अशी तपःश्वर्या करून, आत्मसाक्षात्कार करून घेतलेल्या अनेक सत्पुरूषांची चरित्रें, आपल्या वाचनात येतात. त्याचप्रमाणे संसारांत येणाऱ्या अनंत अडचणींना, मोठया धैर्याने तोंड देवून, परमेश्वरी साक्षात्कारांचे उच्चतम ध्येय साध्य केलेल्या, परमपुरुषार्थी योग्यांची चरित्रे आपण वाचतां. या व्यवहारी जगतातील सर्व सामान्य जनांचा, उपक्षेने त्याग करून, त्या सर्वापासून दूर एकांतात रहाणाऱ्या परमेश्वर प्राप्तसाठीं योग साधना करणाऱ्या योग्यांपेक्षाही परमात्म्याने निर्माण केलेल्या या जगांत, प्रारब्ध कर्मानुसार प्राप्त झालेल्या या संसारातील सुख:दुखाचे आघात, मोठ्या धैर्याने सहन करून शम (मनोनिग्रह), दम (इंद्रियावरील ताबा), शौच (अन्तरबाहय पवित्रता) क्षमा, नम्रता, ज्ञान, विज्ञान, अस्तित्व या स्वाभाविक कर्माचे मोठया निश्चयात्मक बुध्दीने पालन करून सर्व कर्मे, त्या जगन्नियंत्या परमात्म्याच्या संतोषासाठी आपण करीत आहोत, असे मानून त्या सर्व कर्माचे फळ, त्याच्याच चरणी अर्पण करून त्याच्या प्राप्तिसाठी साधना करणारा योगीच श्रेष्ठ होय.

वर
सर्वसाधारण लोकांची संन्यासी, योगी, म्हणजेच दाढी- जटा वाढलेला, अंगावर भगवी वस्त्रे धारण केलेल्या व जन सामान्यांपासून दूर रहाणारा तो योगी, अशी कल्पना असते. परंतु परमेश्‍वर प्राप्तिसाठी, योग्याने संन्यास घेऊन, जनता-जनार्दनापासून दूर राहिलेच पाहिजे असे नाही. वास्तविक आपल्या वैयक्तिक समाधानासाठी दूर राहाणारा योगी आपला स्वतःचा उत्कर्ष करून घेण्यासाठी अर्धोन्मिलीत दृष्टी ठेवून योग साधनेत गढलेला असतो. अशावेळी तो भौतिक कर्मे सोडून, स्वार्थी तृप्तीच्या एकाच इच्छेने वेडा झालेला असतो. पण संसारात राहून ज्ञान साधना करणारा योगी, इतरे-जनांचे काहिहि होवो, परंतु कोणत्याही प्रकारे आपलाच वैयक्तिक उत्कर्ष होवून, आपल्याच परमेश्वरप्राप्तीचे, उच्चतम ध्येय प्राप्त व्हावे, अशा प्रकाराचा स्वार्थी हेतू ठेवीत नाही, ज्या परमेश्वराने जन्माला घातले आहे, त्यानेच आपल्यासाठी कर्मेही निर्माण केलेली आहेत, असे तो मानतो. परमेश्वराला प्रिय वाटतील अशा प्रकारे कर्मे करून, भक्तियुक्त अंतःकरणाने त्याच्या प्राप्तिसाठी प्रयत्न करीत असतो. तोच पुरूष खरा योगी होय.


अनश्रितः कर्मफलं कार्य कर्म करोति य: |
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः
|| भ. गी. अ. ६ ||


कर्म फलाच्या इच्छेचा त्याग करून, जो आपले कर्तव्य समजून कर्म करतो, तो संन्यासी आहे व योगीही आहे. निष्क्रिय यज्ञादी भौतिक कर्माचा त्याग करून रहाणारा संन्यासी-योगी नव्हे!
संन्यास घेवूनही जर त्याच्या ठिकाणी कर्मफलाची इच्छा असेल, तर तो केवळ वेष धारण करण्याने कोणीहि योगी होवू शकत नाही. जो योगी होवूं इच्छितो, जो परमात्म प्राप्तिच्या आत्यंतिक तळमळीने योगारूढ होण्याचा अभिलाषी आहे, अशा भक्ताने भगवंताने सांगितलेल्या वरील श्लोकांप्रमाणे कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतलेले प. पू. सद्गुरु "श्रीसिध्दयोगेश्‍वर महाराज" हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

वर
तसे पाहिलें तर बालपणापासूनच महाराजांच्या ठिकाणी वैराग्यवृत्ति नांदत होती. संसार, तसेच लोकसंग्रह त्यांना प्रिय वाटत नव्हता. प्रारब्ध कर्मानुसार प्राप्त झालेले भोग भोगूनच संपवावयाचे, हया वृत्तीनेच ते संसार करीत होते. नोकरीत असतानासुद्धा कामावर जातायेता, सतत आत्मचिंतनात मग्न असत. घरी आल्यावर ध्यानधारणा चालत असे. संसार चालला होता, परंतू त्यांत त्यांचे मन रमत नव्हते. संसारातील क्षण-भंगुरतेचा जसजसा त्यांना अनुभव येऊ लागला, तसतसे दिवसें-दिवस परमेश्वर प्राप्तिसाठी संसार सोडून जाण्याचे विचार त्यांच्या मनात येऊन ते अस्वस्थ होऊ लागले. ऑफिसमधून सुटल्यावर समुद्रकिनारी किंवा मुंबईबाहेर कसलीहि वर्दळ नसलेल्या जागेत, एकांतात राहू लागले. चिंतनातून ज्यावेळी ते भानावर येत तेव्हांच ते घरी परतण्यासाठी निघत, मग ती वेळ केव्हां रात्री एक वाजलेली असायची किवां दोनची असायची. कित्येकदा तर सर्व रात्रभर ते आत्मचिंतनासाठी बाहेर राहून सकाळी घरी परतायचे. इथें घरची माणसें रात्रभर वाट पाहत, काळजी करत. सौ. माई म्हणजे महाराजांच्या पत्नी, महाराज जेवल्याशिवाय स्वतः त्या अन्नाला स्पर्श करीत नसत. त्यामुळे त्यांना अनेकदा उपवासहि घडत असत. व रात्र रात्र महाराजांच्या येण्याकडे डोळे लावून वाट पहात असत. दिवसामागून दिवस जात होते. महाराजांच्या अंतरीची तळमळ वाढतच होती. आपल्याला या जन्मातच जर परमेश्वराचे दर्शन झाले नाही तर? या नकारात्मक विचाराने ते बेचेन होत. या वासनामय संसारांत राहून, जन्ममरणाच्या यातायातीतून आपली सुटका होणे असंभवनीय आहे असा त्यांचा पक्का निश्‍चय झाला होता.

वर
लहानपणी शाळेंत असल्यापासूनच महाराजांना हिमालय व गिरनार या पर्वतांविषयी विलक्षण आकर्षण वाटे. या गिरीराज पर्वतांच्या गुहांमध्ये एकांतात परमेशवरप्राप्तिसाठी ध्यान धारणा करणारें महान योगी रहातात. हा देह सोडून मुक्‍त झालेले महात्मे सुध्दा, साधकांला त्यांच्या मार्गात उन्नती करण्यासाठी, अदृष्य रूपाने किंवा मानवी देह धारण करून सर्वतोपरी मार्गदर्शन करतात, असे त्यांना ऐकून माहित होते. तेथे गेल्यास आपली व महान सिध्द पुरुषांची गाठ पडून, आपले इच्छित साध्य होईल, असे त्यांना वाटू लागले. दिवसामागून दिवस जात होते, तसतसे या एका विचारानेच त्यांचे मन घेरले जावून ते अस्वस्थ होऊ लागले. गुरू प्राप्तिसाठी त्यांचा जीव तळमळू लागला, एक दिवस त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून, घराबाहेर निघून जाण्याची आपल्या मनाची तयारीही केली होतो. आपल्या पत्नीच्या नांवे एक चिठ्ठी लिहिली की, "मी ईश्‍वरप्राप्तिसाठी घराबाहेर निघून जात आहे. माझा कोणत्याही प्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न करु नये. तुमच्या उदरनिर्वाहाची काळजी तो शक्तिमान दयाधन प्रभू निश्‍चित घेईल. तुम्हांला काहिही कमी पडूं देणार नाही. जर तुम्ही गांवी गेलांत, तर आपल्या जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नावर तुमच्या उदरनिर्वाहाची सोय उत्तम प्रकारे होवू शकेल" ही चिठ्ठी लिहून, ती सौ. माईंच्या उशाखाली ठेवून दिली होती.

वर
त्या दिवशी नेहमीप्रमाणे रात्री दोनच्या सुमारास ध्यानाला बसले. थोडयाच अवधीत त्यांचे देहभान नष्ट होवूंन बाहय संवेदना लुप्त झाल्या, अशा स्थितीमध्ये ध्यानाच्या गूढ अवस्थेमध्ये त्यांना एक दृश्य दिसूं लागलें. ज्या खोलीत ते बसले होते, त्या खोलीमध्ये निळसर रंगाचा मंद मंद प्रकाश पसरला. त्या शांत आणि मनाला धुंद करणाऱ्या |निळसर| प्रकाशांत एक तेजस्वी ज्योत दिसूं लागली. ती ज्योत हळू हळू मोठी होऊं लागली. मोठी होत असतानाच त्या दिव्य ज्योतीमध्ये "भगवान दत्तात्रयांचे" दर्शन होवू लागले. "तीन शिरें, सहा हात" तोंडावर असिम तेज - अशा भगवान दत्तात्रयांनी दर्शन देताच, महाराजांच्या ठिकाणी असणारे अष्ट सात्त्विक भाव उफाळून त्यांच्या नेत्रांतून अश्रूधारा वाहूं लागल्या. श्रीदत्तात्रयांचे दोन्ही चरणकमल आपल्या हातांनी घट्ट धरूनं त्यावर मस्तक ठेवले. नेत्रांतून वाहणाऱ्या अश्रूंनी |साश्रु नयनांनी| भगवंतांचे चरण धुतले, थोडयाच वेळांत भगवंतांनी आपल्या दोन्ही हातांनी महाराजांना उठवून जवळ घेतले व आपल्या हृदयाशी घट्ट धरून दृढ आलिंगन दिले, महाराजांचे कपाळाचे अवघ्राण केले. व विचारले "संसार सोडून पळून जाण्याचा विचार आहे का? पण लक्षांत ठेव पूर्वकर्मानुसार लाभलेल्या या संसारातून पळून जाणे हे भ्याड वृत्तिचे लक्षण आहे. जर मला-परमपुरुषाला भेटावयाचे असेल तर योगमुक्‍त होऊन सर्व कर्माचे फळ मला अर्पण करून कर्म करीत रहा. आत्मस्थिती प्राप्त होण्यासाठी सर्व वासनांचा क्षय करून, या व्यवहारी जगांत अनासक्त भाव ठेवून, माझे सतत चिंतन करीत कर्तव्य कर्म करीत रहा. ही माझी आज्ञा मानलीस तरच तुला परममोक्षपद प्राप्त होईल." भावनावेगामुळे महाराजांच्या तोंडून शब्दही उमटत नव्हते. ते फक्त भगवान श्रीदत्तात्रयांच्या दैदिप्यमान सुंदर मुखकमलांकडे पहातच राहिले. महाराजांच्या नेत्रातून सारख्या अश्रुधारा वहात होत्या. भगवानांनी आपला सुकोमल हस्त महाराजांच्या मुखावरून फिरवीत विचारले "तुझ्या मनांत काही मागावयाचे आहे काय?" त्यावेळी महाराजांनी एकच मागणे मागितले की, "भगवान्‌ या भवगसागरातून सुखरूप तारून नेवून, तुझ्या सत्य स्वरूपाचे दर्शन देवून घडवून देईल अशा महान सद्गुरूंची प्राप्ति व्हावी." भगवंत आपल्या धीरगंभीर आवाजांत म्हणाले की, "या संसारातच ज्ञानसाधना व योगसाधना करीत रहा योग्य वेळ येताच, इथेच तुझ्या इच्छेप्रमाणे गुरुंचा लाभ होईल." तत्काळ महाराजांनी प्रभू दत्तात्रयांचे पाय धरून विनवणी केली की, "मला कशातच स्वारस्य वाटत नाही, त्याचबरोबर काय करावे तेही कळत नाही, म्हणून आपण सतत मार्गदर्शन करावें व आपल्या सत्य स्वरूपाचे दर्शन होवून "आत्मसाक्षात्कार होईल असा आशिर्वाद द्यावा." भगवान दत्तात्रय "तथास्तु" म्हणाले व अंतर्धान पावले.

अशा प्रकारच्या प्रसंगामुळे गुरुच्या शोधासाठी संसाराचा त्याग करण्याचा विचार महाराजांना सोडावा लागला, कारण भगवान श्री दत्तात्रयांची तशी आज्ञाच होती. मुमूक्षू जनांना मार्गदर्शन करण्याची भगवान दत्तात्र्यांची किर्ती त्यांच्या परम भक्तांना माहितच आहे. "दत्त" म्हणताच हजर राहून आपल्या भक्तांचे तारण करणारा म्हणून आपण सर्व त्यांना "दत्तात्रय" म्हणतो. भगवान दत्तात्रयामुळेच सर्वांची सुख: दुखे जाणून घेणारे, दुःखाचे निवारण करणारे महाराजांसारखे सिद्ध पुरूष आपणास लाभले आहेत.

संसारात राहून सर्व साधक पुत्राचे व दुःखाने पिडित होऊन आलेल्या प्रत्येक दुःखी जीवाचे कल्याण करण्यासाठी, खुद्द भगवान श्री दत्तात्रयच महाराजांच्या शरीरांत वास करीत आहेत. याचा प्रत्यय सर्व साधकांना, तसेच भक्ति व श्रध्दापूर्वक येणाऱ्या प्रत्येकाला आलेला आहे.

महाराजांचे सर्व जीवन चरित्र इतर महान सिध्द पुरुषांप्रमाणेच वैचित्र्याने भरलेले आहे. अगदी बालपणापासून त्यांना अज्ञाताची ओढ लागून राहिलेली होती.

प्राप्य पुण्यकृतां ल्लोकनिषुत्त्वा शाशवतीः समा |
शूचीनां श्रीमंता गेहे योग भ्रष्टो भिजायते ||
|| भ. गी. ६.४ ||

अथवा

योगिनामेव कुले भवति धिमताम |
एतद्धि दुर्लभतरं लोक जन्म यदीदृदशम
|| भ. गी. ६.४२ ||

पूर्व जन्मांत अनेक वर्षे योगाभ्यास केलेला योगी, योगभ्रष्ट झाल्यास, त्याला मृत्यूकनंतर, परमेश्वराच्या राज्यांत ज्या ठिकाणी पुण्यवंत लोकांना प्रवेश दिला जातो, त्या उच्च कोटीतील लोकांत प्रवेश मिळतो. त्या ठिकाणी अनंत कालपर्यन्त आपले जीवन व्यतीत केल्यानंतर, परत तो मृत्यूलोकांत, पुण्यवंत श्रीमंत कुळांत जन्माला येतो, किंवा ज्ञानवान योग्यांच्या कुळांत जन्माला येतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी मोठा दुर्लभ आहे. वरील गीतेंतील श्लोकांप्रमाणे महाराजांचा जन्म अशाच श्रीमंत व शुध्दाचरणी, ज्ञानवान कुळात झाला.

वर
महाराजांचे घराणे अगदी पूर्वापार पासूनच ईश्वर भक्ति व जनसामान्याची सेवा करण्याविषयी प्रसिध्द होते. रावजी हे महाराजांच्या पणजोबांचे नांव. ते एक महान धन्वंतरी होते. त्यांच्या घरी आध्यात्मिक ओढ असलेल्या अनेक मुमूक्षूंची वर्दळ असे. त्याचप्रमाणे साधनेत उच्चतम अवस्था लाभलेले सिध्द योगीही त्यांच्या घरी येत असत. घरांत नेहमीच आध्यात्मिक चर्चा व नाम-संकिर्तन चालूं असे. आजूबाजूच्या गावांतील तसेंच दूरदूरच्या लोकांना "रावजीराव" हे रोगांचे अचूक निदान करून औषधोपचार करीत. हे माहीत असल्यामुळे, श्रीमंतापासून ते दिनदुबळयापर्यंत, व्याधीने जर्जर झालेले, अनेक लोक त्यांच्याकडून औषधोपचार करून, व्याधिमुक्त होण्यासाठी येत असत. अशा लोकांवर मोफत औषधोपचार केला जात असे. व्याधीग्रस्त लोकांची सेवा करण्याचे त्यांचे व्रतच होते. त्याच प्रमाणे त्यांचे दुसरे एक विलक्षण व्रत होते. त्यांच्या जेवणाच्या पंक्तिला कोणीतरी अतिथी आवश्यक असे, तो जर नसेलच तर रस्त्यावरून जाणारा कोणीही वाटसरू सुद्धा चालत असे. ज्या दिवशी पंक्तिला कोणीच मिळाले नाही तर त्यांना उपवासही घडत असत, परंतु असा प्रकार क्वचित घडे.

वर
पणजोबांच्या निर्वाणानंतर महाराजांच्या आजोबांनीही तोच वारसा चालविला. त्यांची दिनचर्या रोज ठरल्यासारखी होती. पहाटे उठून नित्य नैमित्तीक कर्मे आटपून, देवपूजा, ग्रंथवाचन, ध्यान-धारणा झाल्यावर, गडी माणसांना शेतांतील कामाची माहिती देवून कामावर पाठविले जात असे. त्याच प्रमाणे त्यांच्या वडिलांनी, नाडी परिक्षा करून कशा प्रकारे औषधोपचार करावा? यांची संपूर्ण महिती त्यांना दिली असल्यामुळे येणाऱ्या व्याधिग्रस्त लोकांवर उपचारहि करावे लागत. रात्रौ जेवण झाल्यावर गावांतील आजूबाजूच्या वाडीवरून अध्यात्माची ओढ असलेले लोक, परमात्म ज्ञानाविषयी चर्चा करण्यासाठी येत. केव्हां केव्हां या चर्चा इतक्या रंगत असत कि रात्रीचे १/२ केव्हां वाजत ते कळतही नसे. आजीने सकाळच्या कामाबद्दल आठवण केल्यावरच, चर्चा थांबवून लोक आपआपल्या घरी जात. आठवडयातून प्रत्येक सोमवार, गुरुवार व शनिवार हे तीन दिवस, त्याचप्रमाणे महिन्यांतून येणाऱ्या दोन्ही एकादशीना रात्री भजनाचा कार्यकम होत असे. त्यावेळी ए्वाद्या अभंगावर प्रवचन होई. संपूर्ण चातुर्मासांत ग्रंथाचे वाचन होत असे, ते ऐकण्यासाठी रोज भाविक लोक जमा होत. अशा प्रकारे दिनक्रम चालूं होता.

महाराजांच्या आजोबांना चार मुलगे होते. तेही या त्यांच्या धार्मिक कृत्यांत मदत करीत. या चारही मुलांवरती भक्तिचे संस्कार घडत होते, व त्यांत ती चारही मुलें रमून जात होती.

वर
कोकणासारख्या आपल्या स्वतःच्या शेतीत आजोबा ऊसांची लागवडही करीत होते. प्रत्येक वर्षी गुऱ्हाळ लावून ऊसाच्या रसापासून गुळ तयार केला जात असे. एके दिवशी असेंच रस काढण्याचे काम चालूं होते. इतक्यात दहाबारा संन्यासी-साधू पाणी पिण्याच्या निमित्ताने घरी आले. आजोबांनी त्यांचे स्वागत करून, बसण्यासाठी आसन दिले व "काय इच्छा आहे असे विचारले", त्या साधूपैकी जे मुख्य होते त्यांनी पाणी पिण्याची इच्छा दर्शविली. पाणी देण्यांत आले, व त्याचबरोबर गुळ तयार करण्यासाठी काढलेल्या रसांतून पिण्यासाठी यथेच्छ रसहि देण्यांत आला. संन्याशाच्या मुखावरील तृप्तीचे समाधान पाहून आजोबांना आनंद झाला संन्याश्यांच्या प्रमुखाने आजोबाकडे प्रसन्नतेने पाहून, तुझ्या घराण्याची कीर्ती सर्वत्र होईल. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला व त्यांना सांगितले कि "मार्गशिर्ष महिन्याच्या सप्तमीला" पूर्णत्वाला गेलेले एक महान योगी येतील, तेव्हां तुला जे पाहिजे असेल ते त्यांच्याजवळून मागून घे. आम्हां सर्वांचे आशीर्वाद तुझ्या घराण्यावर रहातील", असे सांगून ते सर्व संन्यासी निघून गेले. आजोबांना अत्यंत आनंद झाला व संन्याशांनी सांगितलेल्या दिवसाची ते वाट पहात राहिले.

तो दिवस जवळ आला परंतु का कुणास ठावुक? त्याच दिवशी काही तांतडीच्या, सरकारी कामानिमित्त, आजोबांना तालुक्‍याच्या सरकारी कचेरीत जावे लागले. त्यांचे तिन्ही मुलगे नोकरी निमित्त बाहेरगांवी गेले होते. सर्वात लहान चिरंजीवच फक्त शेतीवाडीवर देखरेख ठेवण्यासाठी गांवी आजोबांजवळ रहात होते. आजोबांनी जाण्यापूर्वी घरांतील सर्व माणसांना येणाऱ्या महात्म्याचे योग्य प्रकारे आदरातिथ्य करण्यास बजावले व "मी संध्याकाळी परत येईन" असे सांगून तालुक्‍याला निघून गेले. मार्गशिर्ष माहेन्याची त्या दिवशी सप्तमी होती. संध्याकाळी सूर्य पश्‍चिम क्षितीजावरून नुकताच अदृष्य झाला होता. तोच भगवे वस्त्र धारण केलेले एक योगी दरवाजांत येवून उभे राहिले. अगोदरच कल्पना होतीच. आजी व लहान चिरंजीव वाट पहातच होते. आल्या आल्याच दरवाजाबाहेर उभे राहूनच ते योगी आजोबांची चौकशी करू लागले. आजी व धाकटया चिरंजीवांनी दरवाजांत उभे राहून चौकशी करणाऱ्या योग्याच्या चरणावर पाणी ओतून त्यांचे चरण धुतले व साधू महाराजांना घरांत घेवून योग्य आसनावर बसविले. घरांतील सर्वाची एखाद्या परिचिताप्रमाणे साधू महाराजांनी चौकशी केली. घरातील सर्वोना आजोबांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवू लागली. सर्वांचे डोळे त्यांच्या येण्याच्या वाटेकडे लागले होते रात्र पडू लागली संन्याशी आसनावरून उठले व त्यांनी स्नानासाठी विहिरीवर जाण्याची इच्छा दर्शविली. ते नेहमी, त्रिकाल थंड पाण्यानेचे स्नान करीत असे त्यांच्या बोलण्यावरून समजले. ते विहिरीवर गेले व स्नान करून परत आले. विहिरीच्या जवळच दोन औदुंबराचे वृक्ष होते. अजूनही ते वृक्ष आहेत. तेथे मला बसावयाचे आहे. असे म्हणून ते त्या वृक्षाजवळ गेले. त्या ठिकाणी त्यांना आसन घालण्यांत आले. त्यावर ते बसले, व एक समई आणण्यास सांगितली. त्या समईच्या मंद प्रकाशांत ते ध्यानमग्न अवस्थेत बसले. इकडे आजोबांना येण्यास जसा जसा उशीर होत गेला तस तशी घरांतील सर्व माणसांना काळजी वाटू लागली. रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेला, सर्वांनी आजोबांची येण्याची आशा सोडून दिली. उद्या सकाळी येतील अशी मनाची समजूत करून स्वस्थ राहिले. योगी ध्यानातून उठण्याचे चिन्ह दिसेना. ते समाधि अवस्थेतून जागृतावस्थेंत येण्याची वाट पहात बसणाऱ्या सर्वांना मध्य रात्रीनंतर निद्रादेवीने घेरले. पहांटे ज्यावेळी आजीला जाग आली, तेव्हां त्या समईच्या प्रकाशांत औदुंबराच्या वृक्षाजवळ बसलेला योगी निघून गेल्याचे दिसले. तिने आपल्या चिरंजीवाला उठविले. त्यांनीही शोध घेतला. पण त्याचा काहिही उपयोग झाला नाही. घरांतील सर्वांना त्यांच्या जाण्याने अत्यंत दुःख झाले. दुसऱ्या दिवशी आजोबा घरी आले. त्यांना "योगी" येवून गेल्याचे समजल्यावर. ते स्वतःला दोष देवू लागले. रात्रभर समईतील ज्योत जळूनहि त्या समईतील एक थेंबही तेल कमी झाले नव्हते, याचे सर्वांना आश्‍चर्य वाटले व योग्याच्या सामर्थ्याची कल्पना आली. एवढा महान योगी आपल्या घरांत येवून भेट होऊं शकली नाही, याबद्दल आजोबांना शोक झाला. ते खिन्न झाले. त्यांची अन्नावरून वासना उडाली. असे तीन-चार दिवस गेल्यावर एका रात्री त्यांना दृष्टांत झाला. ते योगी त्यांच्या स्वप्नात आले व म्हणाले, "तुझी व माझी भेट झाली नाही याबद्दल खेद करूं नको. मी इथे ज्या कारणासाठी येवून गेलो, ते कार्य झाले आहे." अशा तऱ्हेने आपली ओळख करून देतांच आजोबांनी त्यांचे चरण धरले व अश्रुंनी ते धुवून काढले. त्या योग्यांनी त्यांचे सांत्वन करून सांगितले कि "मी ज्या वृक्षाच्या छायेखाली बसलो होतो त्या ठिकाणी निर्गुण उपासना करण्यासाठी पादुका स्थापन कर| जो ज्या पादुकांची मनोभावनेने उपासना करील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील." एवढे सांगून त्या योग्याचे दत्तमुर्तीत रूपांतर होवून ते अन्तर्धान पावले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी दत्त पादुकांची स्थापना करण्यांत येवून सर्व माणसे त्यांची पूजा करु लागली. आजही या कुटुंबातील सर्व व्यक्तिंना कोणीतरी अज्ञात शक्‍ती मार्गदर्शन करीत असते याचे प्रत्यंतर येते.

आजोबा वृध्द झाले. त्यावेळी अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांच्या कानावर आली होती. त्यांच्या दर्शनासाठी आजोबांचा जीव तळमळत होता. परंतु वृध्दावस्थेमुळे, त्या काळी प्रवासांची साधने उपलब्ध नसल्या कारणाने कोकणांतून सोलापुर जिल्हयातील अक्कलकोटला जाणे, म्हणजे एक दिव्यच होते. त्यामुळें स्वामींची व त्यांची भेट होऊं शकली नाही. पुढे नोकरी निमित्ताने गेलेली सर्व मुलें सेवानिवृत्त होवून परत गांवी आली.त्यांचीही इच्छा स्वामींचे दर्शन घेण्याची होती. पण त्यावेळी स्वामी आपला देह सोडून गेले होते. काही दिवसांनी चिपळूण मुक्कामी स्वामींचे एक शिष्य आले, त्यांचे नांव गोपाळ स्वामी कुळकर्णी, त्यांची व वडिल चिरंजीव म्हणजे महाराजांचे वडील यांची भेट झाली. तेव्हां पासून महाराजांच्या घरी स्वामींची भक्ती होवू लागली.

वर
महाराजांचे वडिल व तीन नंबरचे चुलते हे ब्रिटीश गव्हर्नमेंटच्या फौजेत नोकरीला होते, दोन नंबरचे पोलिसमध्ये, आणि सर्वात धाकटे वर सांगितल्याप्रमाणे गावीच शेतीवाडीवर देखरेख करण्यासाठी आजोबांजवळ राहिले होते. सर्वात मोठे बाळाजीराव, महाराजांचे वडिल घरची सांपत्तीकस्थिती चांगली होती, तरीही क्षात्रवृत्तीला अनुसरून ते सेन्यांत भरती झाले. त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजाच्या सैन्यांत स्वतःच्या कर्तबगारीमुळे ते लौकिकास पात्र झाले होते. सन्‌ १९१४ सालच्या पाहिल्या जागतिक महायुध्दांत शौर्य गाजविल्याबद्ल इंग्रज सरकारनें मानाची चिन्हें व नाशिक जिल्हयांतील नांदगांव तालुक्यांत नायडोंगरी येथे १४९ एकर जमिन त्यांना "इनाम" म्हणून दिली. सदर जमिन अजूनही वारसा हक्काने महाराजांची आहे.

बाळाजीराव हे सैन्यांत लेफ्टनंट या हुद्यापर्यनत पोहचले होते. एक कर्तबगारी व शूर अधिकारी म्हणून त्यांचा सैन्यांत लौकिक होता. युध्दाच्या धुमश्चक्रित त्यांना मृत्युचे तांडवनृत्य पहाण्याची सवय झाली होती. परंतु मृत्युचे रहस्य समजले नव्हते. ते रहस्य त्यांना एका युध्दाच्या आघाडीवर असताना घडलेल्या घटनेने समजले. व त्यांना ज्ञान-प्राप्ती झाली. त्या प्रसंगाचे वर्णन करीत असतांना त्यांनी सांगितले किं.

वर
एका प्रसंगी इंग्रजांच्या बाजुने सीमेवर आपल्या बटालियन मधून ते आघाडीवर होते. दहाबारा दिवस युध्दाची धुमश्चक्री चालू होती. दोन्हीं सैन्य निकराने युध्द करीत होती. स्वतःचा बचाव करून शत्रूवर हल्ला करण्यासाठी खंदकात बसून लपून छपून युध्द चालू होते. दोन्ही बाजूचे अनेक सैन्य मारले जात होते. परंतु त्यांत कोणालाच यश प्राप्त होत नव्हते. एक दिवस युध्द थंडावल्यासारखे झाले. रात्रीची वेळ होती. ते खंदकातच पहारा करीत बसले होते. इतक्यांत त्यानां आपल्या जवळच कोणीतरी असल्याचा भास झाला, आजूबाजूला पाहिले कोणीच दिसले नाही. एक अदृष्य शक्ति त्यांच्या अगदी जवळ आल्यासारखी वाटली,"व त्या शक्‍तिच्या तोंडून ध्वनी आले किं, "उद्या तुझी इथून बदली होईल, मी तुझ्या पाठीशी आहे. " व ती शक्ति तेथून गेल्याचा भास झाला. युध्द थांबले नव्हते, आश्‍चर्य असें किं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी झाल्याची ऑर्डर मिळाली. त्याप्रमाणे त्यांची ताबडतोब बदली होवून ते दुसरीकडे गेले. त्यानंतर चार दिवसांनी एक भयंकर बातमी त्यांच्या कानावर आली. पूर्वी ते ज्या तुकडीतून युध्द करीत होते, ती सैनिकांची तुकडी शत्रूपक्षाकडून संपूर्णपणे मारली गेली होती आणि या बातमीचा त्यांच्या मनावर अत्यंत खोल परिणाम झाला. ज्या आपल्या सहकाऱ्यांवर नितांत प्रेम केले त्यांची कलवेर पाहून त्यांचे हृदय पिळवटून गेले. एक दिवस आपणा सर्वानाच असे जावे लागणार आहे. हे शरीर नश्वर आहे, असा कधीही न येणारा विचार त्यांच्या चित्तात घर करून राहिला. आपली जर जन्म-मृत्युंच्या चक्रातून सुटका व्हावयास पाहिजे असेल तर एका आत्मज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही, असे विचार त्यांच्यावर झालेल्या पूर्व संस्कारामुळे येवू लागले. पूढे निवृत्तीनंतर रोज ध्यान-धारणा-जप-गीता पठण तसेंच रामायण व इतर धार्मिक ग्रंथाचे वाचन-मनन करीत पुढील सर्व जीवन ते एका विरक्त योग्याप्रमाणे जगले.

वर
अशा पराक्रमी, धर्मनिष्ठ, पित्याच्या आणि जयवंती नामक प्रेमळ निरागस साध्वी मातेच्या उदरी, मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीला गुरूवार दि. १५. १२. १९२७ रोजी पूणे खडकी येथे महाराजांचा जन्म झाला. हा एक योगायोग होता. कांही वर्षांपूर्वी याच दिवशी एका साधूनी त्यांच्या आजोबाना भेट दिली होती गुरूवार होता महाराजांचे पाळण्यांतील नांव वसंत असे ठेवण्यांत आले. वसंताच्या आगमनाने सृष्टीमध्ये नवे चैतन्य निर्माण होवून सर्व सृष्टी आनंदाने भरुन जाते. वृक्ष, वेली, फळा, फुलांनी बहरून जातात. पक्षी आनंदाने नाचतात-गातात तसेच या वसंताने कित्येक निराश व्यक्तिंच्या जीवनांत आनंद फुलविलाआहे. सर्वत्र अपयशाने खचून गेल्यामुळे, इहलोकाची जीवन यात्रा समाप्त करावी, असे विचार आलेल्या दुःखी जीवांना आपल्या सामर्थ्यांचा हात देवून त्यांचे जीवन यशस्वी केले आहे. सर्वांशी प्रेमाची वागणूक असल्यामुळे त्यांच्याकडे येणारा प्रत्येक माणूस आपले सर्व विसरून त्यांचे चरणी लीन होतो. त्यांच्या योगसिद्धी चमत्काराच्या गोष्टी अनुभवून त्यांचे साधक पुत्र त्यांना सिध्द योगेश्वर महाराज म्हणू लागले आणि तेव्हांपासून ते सर्व लोकांत सद्गुरू सिध्दयोगेश्वर घाग महाराज म्हणून ओळखले जावू लागले, येणारे सर्व लोक त्यांना महाराज किंवा बाबा म्हणत. असे हे प.पू. सिध्दयोगेश्‍वर घाग महाराज यांचे मार्गदर्शन लाभले म्हणून सर्व साधक स्वतःला धन्य समजतात. भगवान दत्तात्रेयांनीच भक्तांना मार्गदर्शन करून परम पदाला नेण्यासाठी महाराजांच्या रूपाने अवतार घेतला आहे. अशी सर्व साधकांची श्रध्दा आहे.

वर
महाराजांचे वडील निवृत्त झाल्यावर दहिवली या स्वतःच्या गांवी येवून राहिले. दहिवली हे खेडेगांव आहे. गांवी शिक्षणाची सोय नसल्यामुळे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेवून शाळा चालू केली. तसेच आजुबाजूच्या अनेक खेडेगावांत फक्त मराठी चौथीपर्यंतच शाळा होत्या. त्यांच्या पुढील शिक्षणाचि आबाळ होत असे. त्या मुलांना पुढील शिक्षण मिळतच नसे. अशा मुलांची शहराच्या ठिकाणी रहाण्याची सोय झाल्यास त्यांना पुढील शिक्षण घेणे सुलभ होईल, म्हणून त्यांच्यासाठी शहरातच काही तरी केलेच पाहिजे, याचाच ते विचार करूं लागले. या त्यांच्या विचारातून त्यांना एक कल्पना सुचून सैन्यातून निवृत्त झालेल्या व सैन्यांत असलेल्या लोकांना एकत्र जमवून चिपळूण या शहराच्या ठिकाणी त्यांनी सन १९३६ साली "मराठा मिलिटरी बोर्डींगची" स्थापना केली. त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना अल्प खर्चात रहाण्या-जेवण्याची सोय करून दिली. विद्यार्थ्याना कमी खर्चात शिक्षण मिळावे म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून मानधन मिळवून दिले. अशा प्रकारे गरीब व फौजेत असणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या लोकांच्या मुलांची शिक्षणाची चांगल्या प्रकारे सोय झाली. याच बोर्डींगमध्ये सुरूवातीला त्यांनी आपल्या दोन्ही मुलानां शिक्षणासाठी ठेवले. त्यावेळी महाराज केवळ ९ वर्षाचे होते. एवढया लहान वयांत आई-वोडलांना सोडून आलेल्या मुलांना प्रेमाची वागणूक व ज्याच्या योगे शिक्षणाचो आवड निर्माण होईल अशा त-हेची वागण्याची आवश्यकता होती, परंतु ज्यावेळी एखाद्या मुलाला असा प्रसाद मिळत असे, तेव्हां महाराजांचे मन दुःखी कष्टी होत असे. आधीच मृदू असणाऱ्या महाराजांच्या अन्तःकरणात कालवाकालव होत असे. दिवसामागून दिवस जात होते. महाराज अतिशय विचारमग्न असायचे, वेळ मिळेल तेव्हां देवळांत जावून देवाचे दर्शन घेणे, व सबंध मोकळा दिवस नामस्मरणांत घालविणे, असा त्यांचा 'दिनक्रम चालू होता. खेळांत त्यांचे फारसे लक्ष नसे. त्यांचे सवंगडीही त्यांच्या या वागण्याने बुचकळ्यांत पडत असत. पुढे पुढे तर ते आतिशय शांत होत गेले. त्यांचे नेत्र सतत अज्ञाताचा शोध घेत असायचे. अभ्यासात पाहीजे असावे तसे लक्ष नसे. नेहमी कोठे तरी एकांतात जावून ते ध्यान-मग्न बसत.

वर
वास्तविक ते वय म्हणजे मुलांबरोबर खेळण्या-बागडण्याचे. परंतु त्यांत ते रमत नसत. आपल्या बाल सवंगडयांच्या आग्रहास्तव क्वचित प्रसंगी ते त्यांच्याबरोबर खेळण्यास जात असत त्यांना एकच छंद होता तो म्हणजे एकांतात बसणे त्यासाठी ते नदीच्या काठी असणाऱ्या वृक्षाच्या छायेंत किंवा डोंगरावर असणाऱ्या दाट झाडीत, एखाद्या मोठया दगडावर जावून बसत. भगवंताचे ध्यान करणे, तसेच आपण कोण? कोठून आलो? व कोठे जाणार? जन्माला येणे वा मृत्यू पावणे म्हणजे काय? जन्मापूर्वी मनुष्य कोठे असतो व मृत्यू पावल्यानंतर तो कोठे जातो? एक दरिद्री कुटुंबात तर दुसरा श्रीमंत कुटुंबात जन्माला येतो असे कां घडते? जे जे उत्पन्न होते त्यांचा नाश होतो, तर शाश्‍वत काय आहे? ते कोठे सापडेल? या पंचभूतात्मक शरीराची हालचाल कोण घडवून आणतो इत्यादि प्रश्‍न त्यांना सतत भेडसावित असत. या प्रश्‍नांचा विचार करीत ते तासन्‌तास एकांतात बसत असत.

वर
त्यांच्या बालमनावर प्रकाश टाकणारी अशीच एक घटना घडली महाराजांच्या एका मित्राच्या वडीलांचे निधन झाले होते. महाराज त्या ठिकाणी गेले होते. मित्राच्या वडिलांचा देह अजून तिथेच होता. जमलेले लोक दुःखाने, त्या गेलेल्या माणसांबद्दल आपापसांत बोलत होते कि "बिचारा" चांगला होता. जन्मभर सर्वांशी प्रेमाने वागून, आपला संसार चांगला चालविला होता. पण अर्ध्यावर सोडून निघून गेला. हे शब्द ऐकतांच महाराज विचार करू लागले किं मित्राचे वडील तर झ्थेच आडवे पडले आहेत, मग तो गेला, तो चांगला होता, असे भूतकाळांत हे लोक का बोलत आहेत? मग गेला तो कोण? व इथे जे शरीर पडलेले आहे तो कोण? अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनांत काहूर माजविले. या घटनेचा त्यांच्या बालमनांवर फार मोठा परिणाम झाला. हा देह म्हणजे मी नव्हें, हा देह नश्वर आहे. जो पर्यन्त आंतील "मी" म्हणजे जीवात्मा आहे, तो पर्यन्त या शरीराला किंमत आहे या अचेतन शरीराची हालचाल करणारा कोणीतरी निराळाच आहे! असे त्यांना सतत वाटू लागले व त्यांचे आत्म-चिंतन होऊं लागले. वयाच्या दहाव्या वर्षीच महाराजांना भगवान दत्तात्रयांनी स्वप्न दृष्टांत देवून मंत्र सांगितला होता. त्या मंत्राचा जप करण्यासाठी नदीकांठी किंवा एखाद्या एकांतात असणाऱ्या देवळांत जावून बसत. अशा वेळी त्यांचे नेत्र आपोआप बंद होऊन ध्यान चालूं होत असे. या स्थितीत किती वेळ जात असे त्याचे त्यांना भान नसे.

वर
एक दिवस शाळा चालूं असतांना शाळेत न जातां ते सरळ नेहमी जात असत त्या डोंगरावरील गर्द झाडीत लपलेल्या देवीच्या मंदिरात गेले. देवीचे दर्शन घेवून मंदिराच्या जवळील दाट झाडीत असलेल्या एक वृक्षाखाली जावून ध्यानस्थ बसले. इकडे शाळा चालू झाली होती. आपला मित्र शाळेत दिसत नाही असे पाहून विनायक आगाशे या मित्राचे मन बेचैन झाले त्यांचे महाराजांवर अतिशय प्रेम होते. शाळेंत गैर हजर असलेला आपला मित्र कोठे असेल हे त्याला माहित होते. दुपारच्या मधल्या सुटीत, आपल्या एका दुसऱ्या मित्राला बरोबर घेवून तो सरळ निघाला व ज्या ठकाणी महाराज ध्यानमग्न बसले होते त्या ठिकाणी आला. त्यांची दृष्टी देहाचे भान विसरून बसलेल्या त्या बाल योग्यावर गेली. ते दोघेही भितीने गर्भगळीत झाले. त्या दोघांच्या तोंडून शब्दही फुटेना, कारण ते दृश्यच भयंकर होते. या दोघांची चाहूल लागताच एक भला मोठा भुजंग महाराजांच्या मांडीवरून झरकन निघून जातांना त्या दोघांनी पाहिले. तो भुजंग दूर निघून गेल्यावर विनायकने महाराजांना हलवून जागृत केले. त्यांना आपल्या बरोबर घेवून शाळेची वाट धरली. जातांना, रस्त्यात त्याने ही सर्व घटना महाराजांना सांगितली व विचारले किं, "तुला या प्रसंगाची भिती वाटली नाही काय?" महाराज त्याला म्हणाले कि "जर त्याचे अस्तित्वच कळले नाही, तर भिती कशी वाटणार?" त्याचवेळी आगाशे व त्याच्या मित्राला समजले किं आपला मित्र ध्यानाच्या किती उच्चतम गाढ अवस्थेत असतो ते! त्या दोघांनी ही गोष्ट आपल्या काही खास मित्रांना सोगतली. तेव्हां पासून त्यांच्या सवंगडयांच्या मनांत महाराजांविषयी अत्यंत आदराची भावना निर्माण झाली. शालेय जीवनापासूनच त्यावेळचे त्यांचे सर्व सवंगडी महाराजांना योगीच समजून त्यांच्या जवळ आदराने वागत असत.

वर
अशीच एक दुसरी घटना चोथ्या इयत्तेत असतांना घडली. संस्कृतचा तास चालू होता. शिक्षक शिकवत होते. पण त्याकडे महाराजांचे लक्ष नव्हते. त्यांचे चित्त कोठे तरी अज्ञाताचा शोध घेण्यांत गढले होते. त्यांना एक आवाज ऐकूं आला. "मला भेटायला ये." तास संपला, तसेच महाराज सरळ निघाले ते शहराबाहेर जवळच असलेल्या दत्त मंदिरात हजर. भर दुपारची वेळ होती. बाहेर ऊन रणरणत होते. एकांतात असणाऱ्या देवळाच्या आसपास कोणीही नव्हते. मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल टाकणार तोंच एक भला मोठा, पिवळा धमक, नाग फणा उभारून दरवाजात महाराजांकडे पाहून फुत्कार टाकीत होता महाराजांनी हात जोडून नमस्कार केला व म्हणाले कि, "आज्ञा झाली म्हणूनआलो आहे. आपणांस योग्य वाटेल तसे करावे" असे म्हणताच, त्या नागाचे, डोळे दिपविणाऱ्या, तेजस्वी प्रकाशांत रूपांतर होऊन, ते तेज सरकत सरकत दत्तमूर्तीत विसर्जन पावले. भक्तांची पौरिक्षा घेणाऱ्या भगवंताची ही सुध्दा एक परिक्षा पध्दत असावी.

शहराबाहेरील एकांताचे वातावरण महाराजांना नेहमी आकर्षित करीत असे. ते वातावरण त्यांना खुणावित असे. बोलावित असे. तेथील गर्द वनराईत व नद्यांचे काठ महाराजांना अतिशय प्रिय वाटत असत. वाशिष्टी नदीच्या जवळ असलेल्या गांधारेश्‍वराच्या मंदिरात जावून दर्शन घेतल्यावर जवळच नदी काठांवरील भव्य वृक्षाखाली ते तासनतास ध्यान-मग्न अवस्थेत बसत. केव्हा केव्हा झाडांवरील पक्षांशी, वृक्षांच्या पानांशी, नदीतील झुळझूळ वाहाणाऱ्या पाण्याशी, मंद मंद सुगंधीत व स्वच्छंद वाहाणाऱ्या वाऱ्याशी, तसेच रात्रीच्या वेळी आकाशांत लुकलुकणाऱ्या ताऱ्यांशी. त्यांचा मुक संवाद चालत असे. या अफाट विश्वाच्या उत्पत्तीचे, जीवाच्या जन्म-मृत्युचे, तसेच ज्या परमेश्‍वरांने हे सुंदर विश्व निर्माण केले, त्या परमेश्वराच्या सत्य स्वरूपाचे रहस्य समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न तेव्हा चालूं होते. अशा वेळी संध्याकाळी आपल्या घरटयांकडे पक्षी निघून, संध्याकाळचे रात्रीत रूपांतर होत असे हे त्यांना समजत नसे. त्यांच्या वेळी-अवेळी येणाऱ्या प्रकारांबद्दल व त्यांच्या बोर्डींग मध्ये, मुलांची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या अधिकाऱ्यांची धावपळ होत असे. ते नेहमीच चिंतेत असत." तुझ्या वडिलांना या तुझ्या वागण्याबद्दल सांगेन" असा दमही देत. वडिलांच्या कानावरही ही गोष्ट घालण्यात आली. त्यांना याबद्दल कल्पना नसल्यामुळे आपला मुलगा फुकट जात असल्यासारखे वाटे. त्यांनी महाराजांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु काहिही उपयोग झाला नाही.

वर
अशाच एका पौर्णिमेच्या रात्री, नदीकाठच्या वट वृक्षाखाली ते बसले होते. पूर्ण चंद्र उगवून, त्यांच्या दुधाळ किरणांनी आसमंत न्हावून निघाला होता. पानांनी भरलेल्या वृक्षाच्या फांद्यांतून जीमिनीवर पडलेल्या चंद्र प्रकाशाने जणू सुंदर रांगोळीचे काढली होती. अशा वेळी महाराजांचे चिंतन चालू होते, ते निसर्गाच्या निस्वार्थीपणाचे

कोणत्याही प्रकारची आपेक्षा न ठेवता तो सर्व जीवांची सेवा करीत असतो. आणि इतर जीव या निसर्गाने उधळलेल्या संपत्तीचा नि:संकोचपणे उपभोग घेते असतात. कसल्याही प्रकारचा स्वार्थी हेतू न ठेवता! यत्किंचितही दुजा भाव न ठेवतां, सर्वाना तो ज्याला जसे पाहिजे तसा उपभोग घेवू देणे, ही भूमाता, पर्वत, नद्या, झाडें, वेली, चंद्र - सूर्य, वारा, शत्रू-मित्रत्वाचा भाव न ठेवतां सर्वासाठी सारखे उपयोगी पडत असतात. सुख शांती साठी धडपडणाऱ्या प्रत्येक माणसांने, त्यांचे मनापासून अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर हे जग आनंदाचे व शांतीचे नंदनवन बनेल!

त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधकाला बाबांच्यावर नितांत श्रद्धा असणाऱ्या अनेक भक्ताना त्यांच्या निस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या गुणांमुळे या निसर्गाच्या गुणांचाच महाराजांनी स्वीकार केला आहे, असा अनुभव येतो. त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वांवर ते पुत्रवत्‌ प्रेम करतात. म्हणून सर्व साधक त्यांना "बाबा"म्हणून संबोधतात.

वर
महाराजांचे शालेय शिक्षण चिपळूण व बेळगांवला झाले. पुढे नोकरी निमित्ताने ते मुंबईला आले. मुंबईत त्यांनी सुरूवातीला ४/५ ठिकाणी नोकरी केली, व शेवटी एका प्लास्टिक इंडस्ट्रिजच्या ऑफिसमथ्ये १९ वर्ष नोकरी केली. या काळांत त्यांना निरनिराळ्या तऱ्हेचे अनुभव आले. थोड्याशा श्रीमंत अमाप पैसा मिळविणारे तसेच रात्रंदिवस काबाड कष्ट करून उपाशीपोटी जीवन जगणारे, प्रसादतुल्य बंगत्यात राहणारे, तसेच थंडीवाऱ्यापासून कसे बसे संरक्षण व्हावे म्हणून रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहणारे असे लोक त्यांना दिसले. श्रीमंत अधिक सुख मिळविण्यासाठी तर गरीब आपल्या हालअपेष्टा संपवून सुख मिळावे यासाठी रात्रंदिवस अविश्रांत श्रम करीत आहेत. परंतु खरोखरच यांना सुख प्राप्त होईल कां? असे विचार त्यांना सतावत.

या संसाराचे गणितच मोठे विचित्र आहे! गणितामध्ये नेहमी मोठया संख्येतून लहान संख्या वजा होते, पण या संसाराच्या गणितात लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते. म्हणजे एखाद्या माणसाला परमेश्वराच्या कृपेने अनेक गोष्टी लाभल्या आहेत, व एखादी गोष्ट त्याला मिळाली नसेल तर इतर मिळालेल्या दहाही गोष्टींचे विस्मरण होऊन तो एका गोष्टीसाठीच दुःखी होतो. एखाद्याजवळ सत्ता प्राप्त झाली आहे, संपत्ती आहे, पत्नी आहे, नोकरचाकर आहेत, आरोग्य आहे. सर्व काही आहे, म्हणजे वास्तविक तो सुखी असावयास पाहिजे. परंतु त्याच्या दुर्देवाने त्याला पुत्र संतती नसेल तर! या एका गोष्टीतून बाकीच्या गोष्टीत त्याला सुख लाभत नाही. म्हणजेच या एका संख्येतून बाकी मिळालेल्या सर्व गोष्टी वजा होतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोणत्या ना कोणत्यातरी काळजीचे चिन्ह दिसत असते. या सुखासाठी घडपडणाऱ्या लोकांच्या जीवनांत जराही शांती दिसत नव्हती. त्यामुळे महाराजांच्या मनाला दु:ख होत असे. जीवनात जर खरी शांती लाभावी असे वाटत असेल तर त्याने गरजेपुरते अर्थ मिळवून ईश्वर चिंतन करावे. तरच त्याला खऱ्या शांतीचा लाभ होईल असे त्यांना वाटते. याच काळांत त्यांच्या अनेक योग्यांशी भेटी झाल्या. त्याचप्रमाणे मंत्र शास्त्रात प्रविण असणाऱ्या काही लोकांजवळ त्यांचे फार चांगले संबंध होते. महर्षि विनोद यांच्य़ाजवळही ३-४ वेळा भेटीचा योग आला. या भेटीच्या वेळी मंत्रशास्त्रावर चर्चा होत असे. तसेच इतरही या आध्यात्मिक मार्गात प्रगति केलेले लोक महाराजांना भेटण्यासाठी येत असत.

महाराजांनी अनेक मंत्रांची अनुष्ठाने करून, त्यांच्या सिध्दी प्राप्त करून घेतल्या, या काळात अनुष्ठाने होत होती, यज्ञ केले जात होते.

वर
अशाच एका अनुष्ठान समाप्तिच्यावेळी यज्ञ केला गेला. यज्ञासाठी गोपाळशास्त्री जोशी गुरुजी, फडके गुरुजी, चित्रे गुरुजी व जोशी आडनांव असलेले एक ज्ञानी पुरूष मुद्दाम या यज्ञासाठी गोपाळ शास्त्रीबरोबर आले होते. यज्ञाला सुरुवात झाली. महाराज व आई यजमान म्हणून बसले होते मंत्राच्या शेवटी "स्वाहा" म्हणून आहुती टाकण्यात येत होत्या. जवळ जवळ दोन ते अडीच तास मंत्राहुती चालू होत्या. वातावरणांत गंभीर पावित्र्य निर्माण झाले होते. "स्वाहा" म्हणून सर्वजण मोठया तन्मयतेने I मंत्राच्या शेवटी यज्ञात आहुती देत होते. पूर्णाहुतीला आणखी अर्धा तास अवकाश होता. तोच गोपाळशास्त्री बरोबर आलेल्या जोशींनी मंत्र सावकाश म्हणा असे त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व ब्राम्हणांना सांगितले. यज्ञातील अग्नी अतिशय प्रज्वलित झाला होता. या प्रज्वलित झालेल्या अग्निच्या ज्वालेमधून श्‍वेत वस्त्र परीधान केलेली सर्वालंकार धारण केलेली, मुखकमलावर दिव्य तेज झळकत आहे, अशा चतुर्भुज "आद्य शक्ति" देवी-अंबेने दर्शन दिले. यज्ञ ज्वालेतून देवीने प्रकट होवून नतमस्तक झालेल्या महाराजांना व आईना स्मित मुखाने आशीर्वाद दिला व यज्ञ ज्वालेत अदृश्य झाली. आहुती देता देताच महाराज व आई यज्ञसामग्री बाजूला करून जमिनीवर मस्तक ठेवून नमस्कार करीत आहेत, हे पाहून बाकीच्यांना आश्‍चर्य वाटले. थोडा वेळ दोघंही भानावर नव्हती. मंत्र चालू होऊन पूर्णाहुती झाली. आरती नैवेद्य होऊन सर्वजण बसले असतां ज्यांचा ज्ञानी म्हणून वर उल्लेख केला आहे ते जोशी इतरांना सांगू लागले कि माझे भाग्य मोठे म्हणून मी इथे आलो, आज मला कृतार्थ झाल्यासारखे वाटते. महाराज व आईनी नमस्कार केला तेव्हां मीहि नमस्कार केल्याचे आपण पाहिलेत. महाराजांमुळे आज आम्हाला देवीचे प्रत्यक्ष दर्शन झाले. आशीर्वाद प्राप्त झाला. त्या ठिकाणी असलेल्यांपैकी फक्त महाराज-आई व श्री. जोशी यांनाच दर्शन झाले होते. आपली अनुष्ठानें सफल झाली म्हणून महाराजांना व आईना अत्यंत आनंद झाला. श्री. जोशी महाराजांना म्हणाले आज आपल्यामुळे मला श्रीजगवदंबा मातेचे दर्शन झाले, मी कृतार्थ झालो.

त्यानंतर जोशींनी गोपाळशास्त्रींना विचारले कि हे महाराज कोणाच्या मार्गदर्शनाखाली एवढी कठिण अनुष्ठाने करतात. गोपाळशास्त्रीनी सांगितले कि, "त्यांचा माझा बरेच दिवसांचा परिचय आहे, ज्योतिषशास्त्रावर चर्चा करण्यासाठी ते माझ्याकडे केव्हां केव्हां येतात. ते योगशास्त्र व मंत्रशास्त्रावर अधिकारवाणीने बोलतात. परंतु त्यांनी अजूनपर्यन्त कोणालाही गुरू केलेले नाही. हे त्यांना वाचनांतून किंवा पूर्वजन्मीच्या ज्ञानांतून प्राप्त झाले असले पाहिजे. मी त्यांच्याकडे १०-१२ यज्ञांना तरी आलो आहे. ते एक महान व्यकिते आहेत म्हणून मी आदराने येतो. आज माइ्यबरोबर येण्याचा आपणालाही योग आला" आपल्यामुळे मला आज अलभ्य लाभ झाला, असे जोशी म्हणाले.

पुढेही अनेक अनुष्ठाने झाली. मंत्रासिध्दी प्राप्त झाल्या. तेच मंत्र आज संसारात निराश झालेल्या लोकांना आशेचा किरण देण्यास उपयोगी पडत आहेत. सांसारिक अडचणींनी ग्रासलेल्या अनेक लोकांना स्वतः सिध्द केलेले मंत्र देवून, त्यांच्याकडून साधना-जप करवून घेवून त्यांना अडचणीतून मुक्‍त केले जात आहे. महाराजांच्या आशीर्वादांत केवढे मोठे सामर्थ्य आहे, हे सर्व साधक जाणतात.

वर
येणाऱ्या कोणत्याही आर्त I माणसाचे I संकट महाराजांच्या करूणामय दृष्टीने नाहीसे होते, असें असतांना महाराज मंत्र देवून त्याला रोज नियमाने मंत्र जप केलास तरच तुझे काम होईल असे कां सांगतात? असा प्रश्न भित भितच एका निष्ठावंत साधकांने महाराजांना विचारला होता. तेव्हां महाराज म्हणाले, कि, "मंत्र देण्यामागे एकच उद्देश आहे, येणाऱ्या प्रत्येक माणसाचे मनोदौबर्र्लय नाहीसे होऊन त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. मंत्र जप केल्यामुळे काम झाल्यास त्याच्या ठिकाणी प्ररमेश्‍वराबद्दल भक्ती निर्माण व्हावी, तो भकितमार्गी व्हावा, ज्या कामासाठी मंत्र जप केला व ते काम झाले तर त्याला निश्‍चितच पुढे असे वाटू लागेल किं अशीच मी परमेश्‍वराची भक्ती करीत राहिन, तर संसारात येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी होऊन आपला संसार सुखाचा होईल. या त्याच्या भूमिकेमुळे तो भकतिमार्गी बनून नितीनियमाने वागण्याचा प्रयत्न करतो. आपल्यामध्ये असलेले दुर्गुण टाकून चांगले गुण अणण्याचा प्रयत्न करतो. या त्याच्या वागण्याचा त्याच्या घरांतील माणसांवर चांगला परिणाम होतो. मुलांवर सुसंस्कार घडतात. अशा त-हेने जर त्याच्या ठिकाणी चांगले गुण आले तर तो एक आदर्श नागरिक बनेल, या एकाच उद्देशाने मंत्र दिला जातो -" प्रश्‍नकर्त्या साधकाचे समाधान झाले. वास्तविक बाबांकडे येणाऱ्या प्रत्येक श्रध्दाळू भक्ताच्या संकटांचे निवारण बाबांच्या सामर्थ्यशील आशिर्वादानेचे होत असते. परंतु त्यासाठी येणाऱ्या माणसाची बाबांच्या ठिकाणी भक्ति व श्रध्दा असली पाहिजे, असा सर्व साधकांचा अनुभव आहे.

असेच दिवसामागून दिवस जात होते, बाबांची खडतर साधना चालू होती. शरीराला अनंत कष्ट देवून मंत्राच्या सिध्दी प्राप्त करून घेतल्या होत्या. तरीसुध्दा बाबा संतुष्ट दिसत नव्हते. नेहमी उदासीन दृष्टीने कोणत्यातरी विचारांत बसलेले असत. त्यांची दृष्टी ज्या परमेश्वराच्या कृपेने त्या मंत्रदेवता साहयभूत झाल्या त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी आतुर झाली होती. पूर्वी मंत्रानुष्ठाच्या वेळी संध्याकाळी ६ वाजता महाराज कामावरून सुटल्याबरोबर तडक घरी येत असत. आल्याबरोबर १०-१५ मिनिटांनी चहा घेवून स्नान करून पद्मासनात मंत्रजपाला बसत असत. रात्री साडेबारा ते १ वाजता रोजची ठराविक जपाची जपसंख्या पूर्ण झाल्यावर आसनावरून उठत असत, नंतर जेवण. परंतु आता त्यांनी अनुष्ठाने करण्याचे बंद केले होते. त्यांना एकच तळमळ लागून रांहली होती, ती म्हणजे परमात्म्याच्या दर्शनाची.

अनुष्ठानाच्या पूर्ततेसाठी वेळेवर घरी येणारे बाबा आता कामावरून सुटल्यावर लगेच घरी न येता स्वतःच्या आत्मानुसंधानात गर्क होऊून एकांतवासासाठी पाय नेतील तिकडे चालत जात असत त्यांचा बहुतेक प्रवास पायीच होत असे बहुतेक वेळी ते निर्मनुष्य असणाऱ्या समुद्राच्या किनारी खडकावर बसलेले असत 'किंबा उपनगरांतील कोणत्यातरी झाडीत ध्यानमग्न अवस्थेत बसत असत.

वर
१९५५ मध्ये, महाराजांचे पूजनीय गीताई बरोबर लग्न झाले. संसाराचा गाडा मोठ्या कुशलतेने हाकणाऱ्या त्या आदर्श गृहीणीजवळ ज्यावेळी भेट झाली, तेव्हां मी सहजच महाराजांविषयी काही सांगण्याची विनंती केली त्यांनी नेहमीप्रमाणेच हसतमुखाने संमती दर्शविली. त्या म्हणाल्या त्यांच्याविषयी सांगण्यास मला आनंदच होईल. त्या बोलू लागल्या, पूर्व जन्माच्या पुण्याईवर विश्‍वास ठेवावा लागतो. कारण या जन्मात मी काही अशी पुण्याई केलेली नव्हती, कि ज्या योगे या अवतारी पुरुषाबरोबर माझे लग्न व्हावे. ज्याप्रमाणे इतर “नववधू संसारांत पदार्पण करताना ज्या इच्छा आकांक्षा. हृदयाशी बाळगतात, त्याप्रमाणे मीही त्यातली एक होते. माझ्या माहेरचे वातावरण काही आध्यात्मिक विचार रुजवून पोषक करण्याला 'सहाय्‌यभूत: ठरणारे नव्हते. आमच्या लहानपणीच आई अनंतात विलिन झालेली. आम्हां तिन्ही भावंडांचे वडिलच सर्व काही करीत. पूढे तेही परमेश्वराच्या घरी निघून गेले. आम्ही तिन्ही मुले पोरकी झालो. अशा वेळी देवी करणीच म्हणाना मी चुलत भावांकडे असतांनाच मला मागणे आले. कोणत्याही प्रकारे अडचण न येता या महापुरूषाबरोबर लग्न झाले. सुरूवातीला माझ्या पतीविषयी, या बाबतीत मला काहीच माहिती नव्हती. जस जसे दिवस जावू लागले, तस तशी त्यांच्या असंसारी वृत्तीची ओळख पटू लागली. नववधूच्या मनात असणाऱ्या इच्छा आकांक्षा माझ्याहि ठिकाणी होत्याच. तेव्हां मीहि माझ्या पती देवाला त्यांच्या आध्यात्मिक मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे त्यांच्या जीवनांत समरस व्हावयाचे ठरविले, ठरविले म्हणण्यापेक्षा परिस्थितीमुळे मला व्हावेच लागले. नाहीतर ते घर सोडून केव्हांच निघून गेले असते. मी माझ्या परिने त्यांच्या आध्यात्मिक मार्गात अडचण होणार नाही अशा त-हेने वागण्याचा प्रयत्न करीत होते. ही एक तारेवरून चालण्याची कसरत होती. प्रथम प्रथम संसारात मला अवघडल्यासारले वाटत असे. परंतु लवकरच मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीत समरस होवून वागू लागले. 'त्यांच्या अंगी असलेल्या दैवी गुणांचा मला जसा जसा प्रत्यय येवू लागला तस तसा माझ्या मनांत त्यांच्याविषयी अत्यंत पूज्य व आदरभाव निर्माण होवू लागला. एका योग्याची मी सहधर्मचारिणी होईन ही कल्पना नव्हती. लग्नापूर्वी आई व वडील दोघोहे नसल्यामुळे माझ्यावर पडलेल्या जबाब-दारीमुळे म्हणा, किंवा मुळातच माझा स्वभाव चैनीकडे आकर्षित न होणारा असल्यामुळे म्हणा, त्यांच्याशी संसार करतांना मला जड गेले नाही घरांतील संस्कारांमुळे मी हि देवपुजा, स्तोत्र पठण, मंत्र जप करू लागले. त्यांत मला रसही वाटू लागला. दिवसा, दुपारी कामे आटोपल्यावर धार्मिक ग्रंथाचे वाचनही होऊ लागले.

चरितार्थासाठी कराव्या लागणाऱ्या नोकरी व्यतिरिक्त जो वेळ मिळत असे तो सर्व वेळ महाराज योग साधना, नामस्मरण, चिंतन व तत्त्वज्ञान विषयक ग्रंथाचे वाचन यांत घालावेत असत. वेदांतातील महान वाक्यांवर त्यांचे सतत चिंतन असे. "अहं ब्रह्मास्मि" म्हणजे "मी ब्रम्ह आहे". याची प्रत्यक्षानुभूती मिळावी यासाठी त्यांचा जीव व्याकुळ होत असे. त्यासाठी त्यांची रात्रीदवस धडपड चालू होती. या काळात त्यांच्या अनेक योगी सत्पुरूषांबरोबर भेटी झाल्या. त्यांच्या जवळ चर्चा झाल्या. तसेच देह सोडून गेलेल्या योग्यांनी त्यांची अध्यात्म मार्गात प्रगती व्हावी म्हणून मार्गदर्शन करण्याच्या निमत्ताने स्वप्न दृष्टांतही दिले. मार्ग चालू होता, परंतु आंतरिक तळमळ शांत होत नव्हती.

आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही. म्हणून "भेटी लागे जीवा लागलीसे आंस" अशी त्यांच्या जीवाची तळमळ होत होती. आपली ही तळमळ शांत करील अशा सत्पुरुषांच्या शोधांत महाराज होते. सन्‌ १९४९-५० चा काळ होता. एका समाधीस्थ झालेल्या सत्पुरुषांचे नांव त्यांच्या कानी आले. मुंबईला त्या काळी त्यांची असावी तशी प्रासध्दी नव्हती. एका सद्गृहस्थाने, ओवीबध्द चरित्र असलेला ग्रंथ महाराजांना वाचावयास दिला. महाराजांनी तो ग्रंथ संपूर्ण वाचून काढला. तो ग्रंथ म्हणजे "साईलीलामृत"| त्यावेळे पासून महाराजांची साईबांबांवर भक्ति जडली. अशा सत्पुरूषाने आपल्याला दृष्टांत देवून मार्गदर्शन करावे असं त्यांना सारखे वाटू लागले. त्यांच्या समाधीचे तरी दर्शन घडावे, ही इच्छा प्रबळ होऊ लागली. परंतु सहा माहिने असेच निघून गेले.

वर
एके दिवशी पहाटेच्या वेळी महाराजांना दृष्टांत झाला, त्या दृष्टांतात साईबाबा दारकामाईत धुनीजवळ बसलेले दिसले. पुष्कळ भक्त बाबांच्या दर्शनासाठी जमले होते. एक एक भक्त दर्शन घेवून जात होता. त्याला बाबा उदीचा प्रसाद देत होते. सर्वांचे दर्शन झाल्यावर सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले. फक्त महाराजच शेवटी राहिले होते, पायऱ्या चढून महाराज बाबांच्याजबळ गेले. साश्रूनयनांनी महाराजांनी बाबांच्या चरणावर मस्तक ठेवले. तोच बाबांनी आपल्या दोन्ही हातांनी वर उठवून आपल्या बाहूमध्ये महाराजांना दृढ आलिंगन दिले व बाजूला नेवून खाली बसविले. स्वतः विश्रांतीसाठी र्जामनीवर आडवे झाले. आपला पाय महाराजांच्या मांडीवर ठेवला. महाराज भक्तिभावाने बाबांचे पाय चेपू लागले. थोडयाच वेळांत साईबाबांनी स्मितमुखाने महाराजांकडे पहात आशीर्वाद दिला व धुनीसाठी लाकडे आणण्यास सांगितली, दृष्टांत संपला| याचाच अर्थ ज्ञानाग्नीत संकल्प, विकल्प, आशा-आकांक्षा, विकारांची आहुती देण्याची आज्ञा झाली होती.

वरील दृष्टांत होईपर्यन्त शिर्डीला जाण्याचा योग महाराजांना आला नव्हता. १९५१ साली महाराज शिर्डीला गेले. महाराज जेव्हा शिर्डीला गेले तेव्हा दृष्टांतातील सर्व देखावा जसाच्या तसा त्यांना पहावयास मिळाला. महाराजांनी समाधी मंदिरात जावून समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी आता साईबाबांचा जो संगमरवरी पुतळा आहे तो नव्हता. त्या ठिकाणी पका खुर्चीवर बाबांचा फोटो ठेवलेला असे - त्यावेळचे शिर्डीचे वातावरण गंभीर व कोणत्याही त-हेची जास्ते वर्दळ नसलेले होते. महाराजांनी, बाबांच्यावेळी असणाऱ्यांपेकी कांही व्यवितंच्या भेटी घेतल्या. त्यापेकी लक्ष्मीबाई जिला साईबाबांनी शेवटी जातांना ९ रूपये दिले होते त्या भेटल्या महाराजांनी बाबांविषयी काही माहिती विचारली ती त्यांनी मोठया भक्तीभावाने सांगितली. तसेच म्हाळसापतीचे चिरंजीव मार्तंड यांचीही भेट घेतली बाबांवर महाराजांची श्रध्दा बसली, व त्यांच्या सिध्दत्वाबददल मनांत पूज्यभाव निर्माण झाला.

त्यानंतर साईबाबा महाराजांच्या स्वप्नांत व ध्यानावस्थेत नेहमी येवून योगांच्या गूढ रहस्यमय क्रियाबाबत मार्गदर्शन करीत असत. असेच एकदा स्वप्न दृष्टांतात साईबाबांनी महाराजांना दृढ आलिंगन देवून त्यांच्या कपाळाचे चुंबन घेवून, त्यांच्याकडे कृपादृष्टीने पहात विचारले, "तुला काय पाहिजे?" महाराजांनी सद्गदित आवाजात सॉंगितले कि, "मला काय पाहिजे तेच सांगता येत नाही." दोघेही एकमेकांच्या डोळयात पाहू लागले - महाराजांचे देहभान हरपले. इतक्यांत साईबाबांनी महाराजांना सावध करून ते बोलू लागले की, तुला जे काय पाहिजे ते मिळेल. परंतु मी जे मागेन ते तूं देशील कां?" महाराज क्षणभर गोंधळले, बाबा काय मागणार आहेत? असा विचार पडला. तोच बाबा म्हणाले कि "समचरणाची सेवा कर|" याचा अर्थ निर्गुण निराकाराची उपासना करणे, ब्रम्ह आणि माया या दोहोंना समान लेखून त्यांची भक्ती करणे. महाराजांनी त्यावेळी साईबाबांना विनंती केली की, "बाबा आपण नेहमी स्वप्नांत येवून मला मार्गदर्शन करतां, परंतु आपण मला जागेपणी सगुण स्वरूपांत दर्शन देवून आशीर्वाद द्यावा, म्हणजे माझे जीवन धन्य होईल." साईबाबांनी त्यावर मार्मिक उत्तर दिले ते सर्व साधकांनी, भक्तांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. साईबाबांनी सागितले, "अरे| हे जसे स्वप्न म्हणून म्हणतोस, तसेच जागृतीतील घटनाही स्वप्नातच आहेत." "हे जसे स्वप्न तसेच तेही स्वप्नच." तुला मार्गदर्शन करण्यासाठी, साधनेत प्रगती होऊन आत्मसाक्षात्कार घडविण्यासाठी, साक्षात्कारी सद्गुरूंची प्राप्ती होईल" असा त्यांनीच आशीर्वाद दिला होता.

वर
केव्हां केव्हां महाराज साधनेला एकांतवास मिळावा म्हणून रात्रीचे समुद्राकनारी किंवा अन्यस्थळी जात असत. एकदा असेच समुद्रकिनारी, खडकांवर ध्यानावस्थेत बसले होते. बराच वेळ गेला. पहाटे पाच-साडेपाचची वेळ असेल. जवळ बसलेली माणसे दिसू शकतील एवढा उजेड पडला होता. इतक्यांत त्यांच्या पाठीमागे बसलेल्या माणसाच्या हालचालींमुळे महाराजांचे ध्यान भंगून त्यांनी मागे पाहिले. तीन संन्यासी, आपल्या पाठीमागे. जवळच बसून काहि योगिक क्रिया करतांना त्यांना आढळले. थोडा वेळ गेला असेल, ते आपल्या किय्रेत असतांना विशेष दसल न घेता, महाराज निघून गेले. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही, पहिल्या प्रमाणेच. ते तीन संन्यासी महाराजांच्या मागे येवून बसले. महाराज एकांतवासासाठी त्या ठिकाणी येत असल्यामुळे, आता या ठिकाणी आपल्याला एकांतवास मिळणार नाही असे वाटल्यामुळे ते मनांतून थोडे चिडलेही. आता साधनेसाठी दुसरे एखादे एकांतातील स्थळ शोधावे, या विचाराने ते घरी परतले. तो दिवस गेला. रात्री माई जेवणाचे काम आटपून महाराजांचे पाय चेपीत बसल्या होत्या. त्याच आडवे पडलेल्या अवस्थेत महाराजांचे देहभान सुटून ते ध्यानमग्न अवस्थेत गेले. त्यांच्या ध्यानामध्ये, एक तेजःपुंज संन्यासी दिसू लागला. २५ ते ३० वर्ष वयाच्या या योग्याने अंगावर भगवी वस्त्रे परिधान केली होती. सुदृढ अंगकाठी असलेल्या या योग्याचा वर्ण गौर होता, भेदक डोळे, रेशमासारखी पिंगट दाढी व जटा, खांकेला झोळी, हातात कमंडलू व चिमटा अशी मुर्ति महाराजांसमोर उभी राहिली. त्यांनी महाराजांना विचारले, "काय ओळखले का मला?" महाराज त्यांच्याकडे पहातच राहिले. या संन्यासी योग्याला पाहिल्याचे त्यांना आठवण झाली. आपल्या मागे येवून बसणाऱ्यांपैकी हेच ते मुख्य संन्यासी याची खात्री झाली. दोन तीन दिवस आपल्या पाठीमागे बसणाऱ्या या योग्यांची साधी विचारपूसही केली नाही, याबद्द्ल महाराजांना अतिशय दु:ख झाले. त्यांचे नाव विचारण्याचीही आपल्याला बुद्धी कशी झाली नाही | याबदृदल मनांतल्या मनांत ते आपल्यालाच दुषण देवू लागले. तोंच ते योगी आपल्या धीरगंभीर आवाजात बोलू लागले - "माझे नाव गोरक्षनाथ, तुझ्या साधनेत प्रगती व्हावी, तुला भेटावे अशी इच्छा झाली म्हणून तुझ्या मागे येवून मी बसत असे." प्रत्यक्ष गोरक्षनाथाच्या तोंडचे शब्द ऐकतांच महाराजांना त्यांना न ओळखण्याबद्दल अत्यंत दुःख झाले. त्यांच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रत्यक्ष योगीयांचे योगी गोरक्षनाथ आपल्याजवळ बसूनही, आपण त्यांची साधी चौकशी केली नाही. त्यांची ओळख न पटल्यामुळे दर्शनालाही मुकलो. या एकाच विचारांने ते स्वतःला दुषण देवू लागले. क्षणांत स्वतःला सावरून त्यांनी गोरक्षनाथांच्या तेजःपुज मुखाकडे पाहिले. व त्यांचे चरण धरून परत दर्शन देण्याची विनंती केली. गोरक्षनाथांनी आपल्या दोन्ही हातांनी महाराजांना उठविले. आपला हात त्यांच्या मस्तकावरुंन फिरविला व सांगितले कि, "उद्या पहाटे, दिवस उजाडण्यापूर्वी, मी तुला दर्शन देण्यासाठी येईन." परंतु मी गोरक्षनाथ आहे ही गोष्ट तुइयाशिवाय कोणालाही माहित असतां कामा नये. साक्षात भगवान गोरक्षनाथ घरी येणार म्हणून प्रथमत: महाराजांना आनंद झाला, परंतु दुसऱ्या कोणालाहि बोलू नको अशी आज्ञा झाल्यामुळे त्यांचा विरस झाला. घरी येवूनही जीने आयुष्यभर साध दिली त्या गीताईलाहि कोण येणार आहे? याची कल्पना दिली नाही तर नाथांचे आदरातिथ्य कसे करणार? असा प्रश्न पडला. म्हणून महाराजांनी नाथांना विनंती केली कि, "नाथ, आपण येणार असल्याची कल्पना मी माझ्या पत्नीला देण्याची परवानगी असावी." आपण सर्व काही जाणताच! गोरक्षनाथांनी ही विनंती मान्य केली परंतु आदरसत्कारासाठी थांबणार नाही असे सांगतले. सूर्योदयापूर्वी लांबूनच मी "अल्लख निरंजन" हे शब्द उच्चारीन, हे माझे शब्द ऐकतांच, तुम्ही दरवाजांत उभे राहूनच माझे दर्शन घ्या. तुझ्या विनंतीनुसार मी फक्त तुम्हां उभयतांना दर्शन देवून जाईन." गोरक्षनाथ आपण केलेला आदरसत्कार स्वीकारणार नाही, याबद्द्ल महाराज दुःखी झाले. तीन दिवस भेटूनही आपण त्यांची ओळख करून घेतली नाही म्हणून रागाने ते आपला आदरसत्कार स्वीकारणार नाहीत असे वाटले. नाथांनी महाराजांच्या मनांतील भाव ओळखला. गोरक्षनाथ म्हणाले, "माझे तुझ्या बाबतीतील इच्छीत काम झाले. तुम्ही दोघांनी भक्तीभावाने केलेली मानसपुजा मला आवडेल." महाराजांचे समाधान झाले. वरील ध्यानाचा प्रसंग चालू असताना महाराजांच्या नेत्रांतून वहाणाऱ्या अश्रुधारा व चेहऱ्याबरील भाव पाहून माईंनी महाराजांचे पाय चेपण्याचे थांबवून त्यांच्या मुखाकडे पहातच राहिल्या होत्या. महाराज जेव्हां भानावर आले तेव्हां ही सर्व गोष्ट त्यांनीच माईना सांगितली. रात्रो जेवण करून सर्व झोपी गेले परंतु नाथांच्या भेटीच्या आतुरतेमुळे रात्रभर दोघांनाही झोप लागली नाही. पहाटे स्नान वगैरे करून दोघेही नाथांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात होती. आपणाकडून कोणतीही चूक होऊ नये, या गोष्टींची ती दोघेही काळजी घेत होती.

पहाट होत चालली, क्षणाक्षणाने दोघांच्याही मनांत दर्शनासाठी उत्कंठता वाढत होती. माईनी दरवाजापुढे स्वच्छ करून रांगोळी काढली, आणि उदबत्त्या लावल्या. दोघेही दरवाजांत बसून नाथांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहू लागली. थोडा वेळ गेला असेल इतक्यात मनाला मोहून टाकणाऱ्या सुगंधाने वातावरण भरून गेले त्या सुगंधाच्या वातावरणाच्या पाठोपाठ लांबूनच "अल्लख निरंजन" असे उच्च खाने उच्चारलेले शब्द कानी पडले. दोघांचेही शरीर थरारले. दोघेही दरवाजाबाहेर येवून उभी राहिली. ती तीन दिवस प्रत्यक्ष पाहिलेली व ध्यानावस्थेत दर्शन दिलेली, तेज:पुंज मुर्ती पहातांच दोघांच्या मनांतील "अष्टसात्विक भाव" जागृत होऊन, त्यांच्या डोळ्यांतून आनंदाच्या अश्रुधारा वाहूं लागल्या. तशा स्थितीत विनम्र भावाने दोघांचेही हात जोडले गेले. समोर उभ्या राहिलेल्या त्या तेज:पुंज योग्याचे वय २५ ते ३० च्या दरम्याने असावे. गौर सतेज वर्ण, पिंगट केस, अंगावर भगवी कफनी, उजव्या हातात चिमटा, डाव्या हातात कमंडलू, खाकेत झोळी, उजन्या हातांतील चिमटा डाव्या हातात घेवून आशिर्वादासाठी हात उंचावलेल्या त्या योग्याच्या मुखाकडे पहाता पहातां त्या दोघांनी नाथांचे चरण धरले. डोळ्यांतून बहाणाऱ्या आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुवून अन्तःकरणांतील प्रेममय भक्ती त्यांना अर्पण केली. डोळ्यांतील दिव्य ज्योतीने त्यांना ओवाळले. गोरक्षनाथांनी "मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील" असा प्रसन्नतेने आशीर्वाद दिला आणि क्षणांत जसे आले तसे निघून गेले. एक स्वप्नवत दृश्य संपल्याचे दुःख उभयतांना झाले. परंतु त्याचबरोबर आपण किती भाग्यवान, क्रि प्रत्यक्ष भगवान गोरक्षनाथांनी आपणांस साक्षात दर्शन दिले, याचा आनंदही झाला. गोरक्षनाथ गेल्यावरही बराच काळ वातावरण सुगंधीत राहिले होते.

महाराजांच्या साधनकाळांत अनेक चमत्कार घडले. तसेच त्यांना दिव्य अनुभवही आले. त्यापेकीच वरील एक | महाराजांच्या जीवनांत अशा प्रकारे अनेक महात्मा, दिव्य व्यक्तींचा स्पर्श व आशीर्वाद मिळत गेले व त्यांना दिव्यत्वता लाभली गेली. प्रारब्धाचे भोगणे संपत आले व पुढे लवकरच अकल्पितपणे सद्गुरूंचा त्यांना लाभ झाला.

महाराजांचे चारित्र्य, भक्ती व योगसाधना पाहून, अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. त्यांच्या सहवासांत राहून आध्यात्मिक मार्गदर्शन होईल या इच्छेनेहि लोक येत असत. परंतु एकांतवास प्रिय असणारे महाराज, या लोकांपासून नेहमी अलिप्त दूर राहाण्याचा प्रयत्न करीत असत. त्यातूनही जर कोणी भेटलाच तर त्याला विनम्रतेने सांगत असत कि, "अजून मलाच जर परमेश्वराच्या सत्य स्वरूपाचे दर्शन झाले नाही, तर आपल्याला त्या मार्गाबद्दल मौ काय सांगू? अजूनही मी अपूर्ण आहे." असे सांगून त्या माणसाला वाटेला लावले जात असे.

याच काळांत महाराजांना भगवान दत्तात्रयांचे दर्शन झाले होते आणि गुरूप्राप्ती इथेच होईल असा आशीर्वादही मिळाला होता. थोडे दिवस गेल्यानंतरची गोष्ट आहे. एकदां एक गृहस्थ महाराजांना भेटण्यासाठी आले. काहिही परिचय नसतांना, त्यांनी महाराजांजवळ सहज विषय काढला कि, "आपल्या थोरपणाविषयी मी अनेकांच्या तोंडून ऐकले आहे. तसेच आध्यात्मिक मार्गात आपली फारच प्रगती झालेली आहे. हि प्रगती होण्यासाठी आपण कोणाचे मार्गदर्शन स्वीकारलेत? आपले आध्यात्मिक गुरु कोण?" तेव्हां महाराजांनी उत्तर दिलें कि, "परमेश्वर निरनिराळ्या स्वरूपांत, निरनिराळ्या माध्यमांद्वारे मला मार्गदर्शन करतो. प्रत्यक्ष मानवी शरीर धारण केलेला महात्मा अजुन गुरू म्हणून लाभलेला नाही. ज्याची प्राप्ती झाली असतां क्षणांत आपल्या शिष्याची "कुंडलिनी शक्ती" जागृत करतो असा सिध्द महापुरूष भेटला, तरच त्या महात्त्म्याला गुरू करण्याचा माझा निश्चय आहे.

वर
अशा महात्त्म्याने माझा स्विकार करावा अशी माझी प्रबळ इच्छा आहे". नाम-दिक्षा देणारे, स्पर्श-दीक्षा देणारे, तसेच दृष्टी-क्षेपाने दिक्षा देणारे जे महात्त्मे आहेत. त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणजें जो "संकल्पाने" दिक्षा देवून शिष्याची "कुंडलिनी शक्ती" जागृत करून मार्गस्थ करतो, तोच महात्त्मा सर्वश्रेष्ठ होय, मग तो संसारी असो, अवलिया असो, किंवा संन्यासी असो. तो भगवंताचा प्रत्यक्ष अवतार असतो. त्याच्या बाहय वर्तनाकडे लक्ष न देतां त्याला अनन्यभावे शरण जावें असे अनुभवी लोक सांगतात. "जर असा महात्मा मला भेटला तर त्यांना मी माझें शिष्यत्त्व पत्करण्याची विनंती करीन". एवढे बोलणे ऐेकताच समोर बसलेल्या त्या गृहस्थानी सोगितले की, पुण्यांत "श्री वामनरावजी" गुळवणी महाराज एक साक्षात्कारी महान योगी असून ते संकल्प दिक्षा देतात. या दिक्षेमुळें शिष्याची "कुंडलिनी शक्ती" तात्त्काळ जागृत होऊन त्याचा मार्ग सुखकर होतो. जर आपण त्यांची भेट घेतलीत तर आपले मनोरथ पूर्ण होतील असे मला वाटते. मी फक्त एकाच भावनेंतून आपणाला सांगत आहे कि आपल्यासारखा श्रेष्ठ योगी आम्हांला गुरूबंधू म्हणून लाभावा." एवढे बोलून ते गृहस्थ निघून गेले.

काही दिवसांनी एका अधिकारी व्यक्तीचा लेख महाराजांच्या वाचनात आला. त्या लेखांत "कुंडलिनी शक्ती" जागृतीचे अनेक उपाय सांगितलें होते. परंतु हे उपाय अत्यंत अवघड होते. या उपायांनी, याच जन्मांत ती जागृत होईल याबद्दल त्यात आश्वासन नव्हते. लेखकांने आपल्या लेखांत जे महात्त्में दिक्षा देवून स्वतःच्या शक्ति सामर्थ्याने शिष्याची कुंडलिनी जागृत करतात. त्याची माहिती दिली होती. जो महात्त्मा आपल्या शिष्याची कुंडलिनी-शक्ती जागृत करतो तो खरा सद्गुरू असे एक योगी पुण्याला रहातात, व त्यांचे नांव प.पू. गुळवणी महाराज. असे त्या लेखात नमूद केले होते.

पुढें महाराजांच्या मनांत पुण्याला जावून पूज्य गुळवणी महाराजांनी भेटण्याची इच्छा झाली. दिवंसेदिवसे आतुरता वाढत गेली व एक दिवस महाराज प.पू. गुळवणी महाराजांच्या दर्शनासाठी पुण्याला गेले. योगीराज सदगुरु गुळवणी महाराज व महाराज या दोघांची दृष्टा दृष्ट झाली. एकमेकांची खुण एकमेकांना मिळाली. नुसत्या दृष्टीनेच मनांतील शंका कुशंका नष्ट होऊन मन स्तब्ध झाले. अन्त:करणातील अशांती जावून शांतीचा लाभ झाला.

इतके दिवस ज्याच्या प्राप्तिसाठी आतुरतेने वाट पहात होते त्या महापुरुषाची भेट झाली. आज आपले इप्सित साध्य झाले असे महाराजांना वाटले. नदी समुद्राला भेटल्यावर तिचा खळखळाट आपोआप थांबतो तसे त्यांना झाले. चुकलेल्या मुलाची व आपल्या आईची भेट झाल्यावर मुलाची जशी अवस्था होते. तशीच महाराजांची अवस्था झाली. प्रखर उन्हांतून प्रवास करणाऱ्या वाटसरूला घनदाट वृक्षछायेखाली विश्रांती घेतांना थंडगार वाऱ्याच्या झुळकीच्या गारव्यामुळें थकवा जावून जसें त्याचे मन ताजेतवाने होऊन प्रफुल्लित होते, तद्वतच महाराजांना झाले. सद्गुरूसुद्धा अशा प्रगत शिष्याची आतुरतेने वाट पहात असतात. या महापुरूषाच्या परिक्षेते महाराज उत्तीर्ण झाले होते. दीक्षेची तारीख ठरली. महाराज परत मुंबईला येवून आपल्या गांवी म्हणजे "दहिवलीला" निघून गेले. सद्गुरूंनी सोंगितल्याप्रमाणे पत्रव्यवहार झाला. ठरलेल्या दिवशी दीक्षेसाठी बसावें अशी आज्ञा झाली. "१५ मे १९६६ रोजी सकाळी ६ वाजंता" महाराजांना "संकल्प दिक्षा" मिळाली. सद्गुरूंनी लिहिलेल्या पत्रात आपण कोणतीहि क्रिया जाणून बुजून करूं नये, जागृत झालेली शक्ति ज्याप्रमाणे क्रिया करवून घेईल, त्या प्रमाणे होऊं द्यावें, होणाऱ्या कोणत्याही क्रियेला प्रतिबंध करु नये. अशी आज्ञा होती. उद्या दिक्षा मिळणार या आनंदात संबंध रात्रभर महाराजांना झोप लागली नाही. पहाटे सर्व नित्य नैमित्तिक कर्मे आटोपून स्नानानंतर आई व वडिलांना नमस्कार करून, त्यांचे आशिर्वाद घेतलें. "आपल्या ग्रामदेवतेचे व कुलस्वामिनीचें'" मनातल्या मनात स्मरण करून नमस्कार केला. दिक्षेसाठी बरोबर ६ वाजतां आसनांवर बसलें. थोडयाच वेळांत सर्व शरीर थरथरू लागलें व घामाच्या धारा वाहूं लागल्या, जसा जसा वेळ जावृ लागला, तस तशा दिव्य अनुभूती येवू लागल्या. डोळ्यांना त्रास न होणारा परंतु. अतिशय तेजस्वी प्रकाशाचा झोत आपल्या शरीरांत प्रवेश करीत आहे, असें दिसले. त्या प्रकाशाने आपल्या सर्व शरीरांत अमुलाग्र बदल होत असल्याचे त्यांना जाणवले, एक अनुभव संपतो, न संपतो तोच दुसऱ्या क्रिया होऊ लागल्या, शरीराची जोरदार हालचाल होऊ लागली, शरीर चक्राकार फिरण्याचा वेग ऐवढा प्रचंड होता कि क्रिया थांबवाबी म्हटली असती तरी ते शक्य नव्हते. त्या दिवशी योग शास्त्रांतील अनेक क्रिया आपोआप होत होत्या. बरोबर ३ तासांनी ज्यावेळी डोळे आपोआप उघडलें गेले, तेव्हां महाराज साधनेवरून उठले. अनेक त-हेचे दिव्य अनुभव घेतल्याचे समाधान त्यांना लाभले. आपले जीवन कृतार्थ होईल किंवा नाही याबद्दल आता मनांत कोणत्याही त-हेचा संदेह राहिला नाही.

पूर्णपणे ज्योवेळी परमेश्वराच्या सत्यस्वरूपाचे ज्ञानदर्शन होईल म्हणजे साक्षात्कार होईल, त्याचवेळी आपले जीवन कृतार्थ होईल ही महाराजांची धारणा होती. सर्व दिवस याच अवस्थेत गेला, सकाळ-दुपार-संघ्याकाळ व रात्री अशी सतत साधना होऊ लागली. गावांतील घर एकांतात, व साधनेसाठी स्वतंत्र खोली होती. एवढे असल्यावर दुसरे काय हवे होते. रजेचा एक महिना केव्हां गेला तेच त्यांना समजले नाही. या एका महिन्याच्या कालावधीत दिवसेंदिवस महाराज स्वतःला जास्तीत जास्त वेळ कोंडून घेवू लागले. त्यांना बाहय जगतांत कशातच रस वाटेनासा झाला साधनेत रोज नवीन नवीन अनुभव येवूं लागलें.

वर
पूर्वी करीत असलेली योग शास्त्रांतील आसने, प्राणायाम व दिक्षेनंतर आपोआप होणारी आसने व प्राणायाम यांत जमीनअस्मानाचे अंतर असल्याचे जाणवू लागले. होणारा कुंभक इतका सहजतेने दिर्घ होऊ लागला की महाराज स्वतःच आश्चर्यचकित होत! केव्हां केव्हां मुखांतून मोठ्या आवाजाने होणाऱ्या ओमकारांने सर्व वातावरण बदलून जात असे. पूर्वी कष्ट साध्य, असणाऱ्या योग शास्त्रांतील क्रिया करण्यासाठी महाराज ज्या साधनांचा उपयोग करीत, त्यांच्या या साधनेत काहिच उपयोग नव्हता, निरनिराळ्या क्रियांनी मुद्रा साध्य होत होत्या.

एक दिवस साधनेच्या खोलींत साधनेला बसल्यानंतर शरीर उताणे आडवे झाले व सरकत सरकत हात काही तरी शोधूं लागले. हातांत खोलीत असलेली दर्भाची चटई लागली त्या चटईतील एक दर्भाची पात काढली गेली, हे सर्व महाराजांना समजत होते परंतु हे कशासाठी होत आहे, तेच समजत नव्हते. इतक्यांत तोंड उघडून ती दर्भाची पात जिभेच्या खाली जी शिवण असतें त्या ठिकाणी ठेवली गेली व दुसऱ्या हाताने एवढया जोरांत खेचली गेली किं जिभेची खालील शिवण कापली जावून तोंडातून भळाभळा रक्त वाहूं लागलें तेव्हां महाराजांच्या लक्षांत आले किं, "खेचरी मुद्रा" होण्यासाठी ही क्रिया झाली असावी. ही क्रिया होतांच महाराजांना थोडी भितीहि वाटली. लगेच आपल्या सदगुरूंची भेट घेवून त्यांना या क्रियेविषयी त्यांनी सांगितले. सदगुरूंच्या मुखावर आनंदाची छटा उमटली व म्हणाले किं, "कोणत्याही क्रियेबद्द्ल भिती बाळगतां कामा नये". ज्याप्रमाणे क्रिया होत असतील, त्याप्रमाणे त्या क्रिया नि:संकोचपणे होऊ द्याव्यात. कितीही अवघड क्रिया होत असली तरी मनांत भिती बाळगूं नये, त्या क्रियेला प्रतिबंधही करु नये. जर मन भ्याले तर कुंडलिनी शक्ति तशा त-हेची क्रिया पुन्हां कधीच होऊ देणार नाही, व त्या क्रियेची पुढील प्रगती खुंटेल.

त्या दिवसापासून होणाऱ्या कोणत्याहि क्रियेला महाराजांनी प्रतिबंध केला नाहीं. कामाचे आठ तास व इतर नित्य नैमित्तिक कर्मासाठी, २ ते ३ तास सोडल्यास रात्रंदिवस महाराजांची साधना चालूं होती. कामावर जातांना येतांना सतत अनुसंधानात असायचे. त्यावेळची अवस्था निराळीच होती. आत्मानुसंधानापासून वंचित करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या त्या गोष्टींचा त्यांनी पूर्वीच त्याग केलेला होता. आता ते जवळच्या माणसांनाही भेटत नसत. ऑफिस सुटल्याबरोबर, एकांत वासासाठी पाय नेतील तिकडे जाणारे, महाराज आता साधनेसाठी बरोबर ६ वाजतां घरी येऊ लागले. घरी येवून माईंनी केलेला चहा घेतला की हातपाय धुवून खोलीचे दार बंद करून साधनेला बसत असत. प्रथम प्रथम संध्याकाळी ७ वाजता साधनेला बसत असत व रात्रौ १० वाजतां उठत असत. व नंतर जेवण घेत असत. दिवसेंदिवस योगांतील अत्यंत गूढ क्रिया होऊ लागल्यामुळे साधनेचा वेळ वाढत जाऊ लागला. साधनेसाठी महाराज स्वत:ला जास्तीत जास्त वेळ कोंडून घेऊ लागले. रजेचा संपूर्ण दिवस साधनेत जावू लागला.

रात्रीच्या साधनेची वेळही वाढत चालली होती. एक दिवस असेंच साधनेवरून महाराज उठले. माई बसल्या स्थितीतच भिंतीला डोके टेकून झोपी गेल्या होत्या घडयाळांत पाहिले तो रात्रीचे पावणेदोन वाजले होते, माई उपाशीच, बसून झोप काढीत आहेत, हे पाहून महाराजांना अतिशय दुःख झाले. महाराज जेवल्याशिवाय माई कधीही अगोदर जेवत नाहीत. आपण कितीही सांगितले तरी माई अगोदर जेवणार नाहीत, याची महाराजांना कल्पना होती. महारांजांनी माईंना समजावून सांगतले कि मला आता एकवेळचे जेवण सोडावे लागेल. रा रात्री जेवल्यावर साधनेच्या क्रियांवर परिणाम होतात व अडथळे निर्माण होतात, म्हणून यापुढे मी रात्रीचे जेवण घेणार नाही. तू वेळेवर जेवत जा. अशा त-हेने सहा वर्षे महाराज फक्त एकवेळचे जेवण घेत असत. त्यामुळे शरीर कृश होत गेले. पण चेहऱ्यावरील तेज मात्र दिवसेंदिवस वाढत गेले. या सहा वर्षाच्या अवधीत महाराज कधीही जमिनीवर अंथरूण घालून झोपले नाहीत. साधनेतच, कोणत्या तरी आसनांत त्यांना थोडा वेळ निद्रा लागत असे व ती १-२ तासांची निद्रा संपल्यावर लगेच क्रियांना सुरुवात होत असे. यालाच योगनिद्रा म्हणतात.

वर
अशा प्रकारे सहा वर्षात अनेक क्रिया होऊन, पुढे क्रिया होणे बंद झाले. आतां बाह्य क्रिया संपूर्ण बंद झाल्या होत्या. महाराज तासनतास डोळे बंद केलेल्या अवस्थेत बसलेले असत. आतां त्यांच्या वृत्तीत आमुलाग्र बदल झाला होता. समाधी अवस्थेतून उठल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसत असे. जन्मापासून अनेक तपे व व्रतें करून दीक्षा मिळून गेल्यावर ७ वर्षे खडतर साधना केल्यावरच एक दिवस त्यांना देवत्व प्राप्त झाले.

महाराजांबरोबर संसार करतांना माईंना कोणते अनुभव आले, हे त्यांच्याच शब्दांत दिलेले आहेत. माई सांगतात की, "लग्न झाल्यानंतर प्रत्येक दिवशी मनाला एक प्रकारची भिती वाटत असे की, परमेश्वर प्राप्तिसाठी वेडे झालेले माझे पती मला सोडून दूर निघून तर जाणार नाहीत ना | कोठे तरी वाचलें की संसारात पदार्पण केलेल्या गृहस्थाने आपल्या पत्नीला जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत पुत्रप्राप्तीचा लाभ दिला नसेल तर त्याला संन्यास घेता येणार नाही. ते एक पाप ठरेल, माझे पती जरी ज्ञानी होते तरी सुध्दा कदाचित वरील गोष्टीचे विस्मरण झाले तर? म्हणून मी केव्हां केव्हां त्यांना आठवण देत असे, तेव्हा ते म्हणायचे कि, "या सर्व पळवाटा आहेत. प्रत्येक मनुष्य आपल्या पूर्व कर्मानुसार जीवन जगत असतो, तुम्ही सुध्दा पूर्व ऋणानुबंधनानेच माझ्या संबंधात आला आहांत. जोपर्यंत हे ऋणानुबंध आहेत तोपर्यंत आपण एके ठिकाणी रहाणार आहोत. तेव्हा उगाचच मनामध्ये भिती किंवा खेद न बाळगतां प्रारब्ध कर्मानुसार आपले जीवन जगण्याची तयारी ठेवा."

अशा त-हेने लग्न होवून चार वर्षे निघून गेली. पांचव्या वर्षी मला दिवस गेले. वास्तविक मला आनंद व्हावयास पाहिजे होता. तशा सुखद संवेदना होत होत्या, परंतु मध्येच कुठें तरी शंकेची पाल चुकचुकल्यासारखे व्हायचे. मला जर मुलगा झाला तर हे आपण यांच्या ऋणातून मुक्त झालो, असे समजून निघून तर जाणार नाहीत ना | अशी शंका आली की, मी बैचेन होत असे. परंतु मीच मनाला धीर देत असे की असे काही घडणार नाही. माझ्या पाहिल्या मुलीचे नांव उज्ज्वला. ही उज्वला पोटांत असतानांत माइया पतींच्या दैवी सामर्थ्याचे दर्शन झाले, प्रसंग असा होता.

माईंना आलेले दैवी अनुभव

मला पांचवा महिना लागला होता व मला ताप येवू लागला. २ दिवस १०२ पर्यंत सबंध दिवस ताप असायचा. डॉ. मिस वगळ यांचे औषध चालू होते. माझी बहीण व मी डॉक्टरांकडून औषध आणायला जात होतो. परंतु तिसऱ्या दिवसानंतर तापामुळे माझ्यातले त्राणच नाहीसे झाले. आतां डॉक्टरच रोज घरी येऊन तपासून मला इंजेकशन व औषध देवू लागल्या. परंतु ताप उतरण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मी माइया पतींचा "पती" या नात्याने उल्लेख न करतां, "महाराज" असा उल्लेख करणार आहे. महाराज रोज आपले नित्य नैमित्तिक आटोपून माझ्या आजाराविषयी माइया जवळ चौकशी करून व औषधे घेण्याचा ब तापमान नोंद करून ठेवण्याच्या सूचना देऊन कामावर निघून जात. संध्याकाळी परत आल्यावर शांताने (म्हणजे माझ्या बहिणीने) लिहिलेले २ तासांच्या अंतराने मापलेल्या तापाची नोंद ते पहात असत. आतां रोज ताप २ ते ३ पर्यंत चढत असे व कमीत कमी दोन पर्यंत येत असे. औषधाचा गुण काही पडत नव्हता. माझे मन मात्र घाबरू लागले. आपण या आजारांतून काही जगत नाही, असे वाटू लागले. मला वाईट भितीदायक स्वप्ने पडू लागली. ताप येवू लागल्याला ७ वा दिवस असेल, आज रजा असल्यामुळे महाराज माझ्या बाजूला बसून "कोलन" वॉटरची घडी माझ्या कपाळावर ठेवत होते. मी त्यांना म्हणाले की या आजारातून मी उठेन असे मला वाटत नाही. स्वप्नांत कोणी तरी काळा माणूस येवून तो मला ओढीत नेत असल्याचे दिसते, त्यामुळे मला फार भिती वाटते. आपण एवढी परमेश्वराची भक्ति करतां, तो आपले नाही का ऐकणार? क्षणभर महाराज स्तब्ध झाले. त्यांचा चेहरा गंभीर होत गेला. ते माझ्याशी बोलू लागले की, "हे पहा "गीता" मी जो भक्ती करतो ती काही संसारातील सुखे मिळावीत म्हणून करीत नाही." तुझे आयुष्य तेवढेच असेल तर मी काही तुझे आयुष्य वाढावे असे भगवंताला सांगणार नाही. जसे त्याला करावयाचे असेल त्याप्रमाणे करील. मी त्यांच्या पुढे काही बोलू शकत नव्हते. परंतु माझ्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडले की माझे आयुष्यच तेवढे असेल तर मला बरे वाटावे अशी विनंती मी आपणाला करणार नाही. परंतु एका दृष्ट अदृष्य शक्तीकडून आपल्याला त्रास होवून अपघाती मृत्यू म्हणतात, तसा जर मला आला तर? हे शब्द ऐकतांच आपल्याच तंद्रीत असणारे महाराज एकदम भानावर आल्यासारखे झाले व एकदम एवढ्या आत्मविश्वासाने म्हणाले की, जगांतील अशी कोणती दुष्ट शक्ति तुला अपघाताने माझ्यापासून हिरावून नेऊ शकेल? तुझा माझ्यावर विश्वास आहे नां| मग तू निश्चिन्त रहा."

असेच आणखी दोन दिवस गेले, ताप काही कमी होण्याचे चिन्ह दिसेना, उलट त्या दिवशी १०५ ताप चढला. गुरुवारचा दिवस होता. त्या दिवशी डॉक्टरनी माझ्या बहिणीला सांगितले कि संध्याकाळी यांचे यजमान आले की तुझ्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये भरती करा. विशेष म्हणजे माझा मोठा भाऊही त्या दिवशी माझ्या जवळच होता. डॉक्टरच्या औषधांनी ताप उतरत नाही, म्हणून तो त्या दिवशी एका मोठ्या मांत्रिकाकडे गेला होता. संध्याकाळची वेळ होती. मी तापाने फणफणले होते. पोटांत असलेल्या गर्भाबद्द्ल मनांत भिती वाटत होती. गरोदर स्त्रियांना २-३ डिग्री ताप जर सतत राहील तर गर्भपात होण्याची शक्यता असते. मला आज १२ दिवस १०२ डिग्री खाली ताप उतरला नव्हता. महाराज कामावरून घरी आले होते. आल्याबरोबर माझी चौकशी केली. अंगाला हात लावून पाहिला व शांताने नोंदलेल्या संबंध दिवसाच्या तापाची नोंदणी पाहिली. डॉक्टरनी सांगितलेले त्यांना शांताने निवेदन केले. तरीही ते स्नानाला गेले. दर गुरूवारी, स्नान करून देवाची आरती पूर्वी पासून ते करीत असत. स्नान झाल्यानंतर, त्यांनी ताम्हणांत निरंजन पेटविले, इतक्यांत माझा भाऊ बाहेरून माझ्या जवळ आला व माझ्या कानाजवळ तोंड आणून हळू आवाजात सांगू लागला की, "मी एका मांत्रिकाकडे जाऊन आलो." त्याने सांगतले की डॉक्टरांच्या औषधाचा गुण येणार नाही. कारण त्यांच्या घराण्यांत पूर्वी पासून एक जबरदस्त सैतानी शक्ति वावरत आहे. तीच तुझ्या बहिणीला त्रास देत आहे. जर हा ताईत तिच्या गळ्यात बांधशील तर तिला औषधाचा गुण येऊन बरे वाटू लागेल." मी त्याला म्हणाले की, "ही गोष्ट त्यांना आवडणार नाही. तू त्यांना सांगून पहा. भावाने ही गोष्ट त्यांना सांगताच त्यांचा चेहरा रागाने लालबुंद होवू लागला - त्यांनी भावाला शांतपणे सांगतले की, "तुम्ही तांत्रिकाकडे जावून आलात त्याबवृदल मी तुमच्या भावना समजू शकतो. तुम्ही फार चांगली गोष्ट केलीत. मला कोणाचाही अपमान होईल असे वागावयाचे नाही. परंतु तुम्ही आणलेली वस्तू या घरांत आणू नका!" त्या प्रमाणे ती वस्तू घेवून तो ताबडतोब बाहेर गेला. तबकांत पेटविलेले निरंजन घेवून ते देवासमोर गेले व आरतीला सुस्वात न करतांच विस्फारित नेत्राने दत्तात्रेयांच्या फोटोकडे पहात राहिले. त्यांचे सर्वांग थरथरत होते. चेहरा रागाने लालबुंद झाला होता. रागाने त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द मला ऐकू येत होते. "आज पर्यंत तुझ्या भेटी व्यतिरिक्त कोणतीच इच्छा ठेवून मी तुझी भकित केलेली नाही."अनन्यश्‍चिंतयतो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ता योगक्षेम वह्यम्यहं "हे ब्रीद बाळगणाणाऱ्या तू झोपलास कां? असा प्रश्‍न त्यांनी विचारला. ज्या भक्ताच्या घरी तुझे वास्तव्य असायला पाहिजे, त्या ठिकाणी जर आसुरी शक्तिचा प्रवेश होऊन जर अपघात होऊ लागतील तर तुझी भक्ति कोण करेल? आतां मात्र त्यांचे भान नाहिसे होऊ लागले होते. जवळच असलेली, माइयासाठी आणलेली औषधे त्यांनी आपल्या हातात घेतली व औषधाच्या पुड्या 'खिडकीतून बाहेर फेकून दिल्या औषधाची बाटली फोडून टाकली, शिवाय आणलेली सर्व इंजेक्शनचा फोडून चक्काचूर केला. या त्यांच्या कृतीकडे पाहून आम्ही सर्व घाबरून गेलो. ते देवासमोर उभे राहिले व माणसांजवळ आपण बोलतो तसे बोलू लागले. प्रत्यक्ष परमेश्वराला ते बजावत होते की, "याद राख! जर माझ्या पत्नीला वाईट शक्तिंमुळे अपघाती मृत्यू आला तर या जगात परमेश्वर नांवाची काही चीज आहे असे मी मानणार नाही. तुझी भक्ति करणाऱ्यांचे वाईट शक्तींकडून तू संरक्षण करूच शकत नाहीस, अशी माझी समजूत होईल! तुझ्यापुढे अशी कोणती शक्ति आहे की ती आपला प्रभाव दाखवू शकेल. जर १५ पिनिटांत माइया पत्नीचा ताप उतरला नाही तर १६ व्या मिनिटाला तुझे फोटो, तुझी मूर्ती व माझ्या मनांत असणारी तुझी भक्ती यांना समुद्रात नेवून सोडीन| सर्वाना तुझ्या भक्तिपेक्षा आसूरी शक्तींना भजण्यासाठी सांगेन व ते रागाने थरथरत तसेंच देवासमोर उभे होते. आम्ही सर्वजण भितीने गांगरून गेलो होतो. आश्चर्य वाटेल, १० मिनिटे त्याच अवस्थेत गेली असतील, इतक्या माइ्या अंगातून घामाच्या धारा वाहूं लागल्या. मी हळूच त्यांना हाक मारू सांगितले की मला घाम येत आहे. तरीसुध्दा ३ मिनिटे ते तशाच अवस्थेत उभे होते. माझे अंथरूण बदलतां का? घामाने सर्व भिजून गेले आहे. हे शब्द कानी पडतांच, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले, रागाचे रूपांतर कृतज्ञतेत झाले. त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव उफाळून येवून त्यांच्या नेत्रांतून अश्रूधारा वाहूं लागल्या. परमेश्वराला सुध्दा आल्या भक्तांकडून अधिकार गाजवून घेण्याची होस आहे का? अशी पृच्छा त्यांनी माझ्याकडे केली.

लगेच माझे सर्व घामाने भिजलेले कपडे बदलले, ताप कमी होवू लागला. २ तासांत माझा संपूर्ण ताप निघाला. तो परत भरला नाही. औघधे बंद झाली. आज या गोष्टीला २८ वर्षे झाली. त्या दिवसापासून जो ताप गेला तो आजमितीपर्यंत| त्यानंतर मला ताप कसा तो माहित नाही. परमेश्‍वराजवळ पितापुत्राचे नाते जोडलेल्या साधकांचा आपल्या पित्यावर म्हणजे परमेश्वरावर केवढा अधिकार चालतो व मोठय़ा प्रेमाने तोही अधिकार चालवून घेतो, प्रत्येंतर त्या दिवशी मला आले. एक अनुभव संपला आणि अनेक अनुभवांची मालिकाच सुरू झाली.

वर
२१ नोव्हेंबर २००३ ची रात्र. महाराजांचे आरोग्य चांगले होते. कोणालाही कल्पना नव्हती पण त्या रात्री अचानक मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले, बराच वेळ प्रयत्न करून हि त्यांना बरे वाटत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांचे शिष्य डॉक्टर राजेश गायकवाड ह्यांना फोन करण्यास सांगितले आणि डॉक्टरांनी फोनवरूनच महाराजांच्या मुलांना सागिंतले कि महाराजांना इस्पितळा मध्ये नेण्याची गरज आहे. त्यांना हरकिसनदास इस्पितळ म्हणजे आताचे रिलायन्स इस्पितळा मध्ये हलविण्यास सांगितले व स्वतः तिकडे लगेच पोहचतो आणि ते तिथे पोहचले. डॉक्टर राजेश गायकवाड यांनी डॉक्टर गोडबोले ह्यांना ही हरकिसनदास इस्पितळा मध्ये बोलिवले. महाराजांचे हार्ट फैल झाले होते आणि जवळपास सगळेच हृदय बंद झाले होते. इस्पितळात कॅज्युलटी विभागात महाराजांना नेण्यात आले तिथे डॉक्टरांना केस हाताच्या बाहेर गेल्याचे कळले पण राजेश डॉक्टरांनी, गोडबोले डॉक्टर व इतर हॉस्पिटलचे चार डॉक्टर यांना बरोबर घेऊन अतोनात प्रयत्न केले. जवळ जवळ अर्धा ते पाऊण तास प्रयत्नांची पराकाष्ट केल्या वर हृदय पुन्हा कार्यरत झाले व सगळ्यांना जीवात जीव आला. मग महाराजांना ताबडतोब अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आणि सर्व उपचार सुरु केले, सगळे डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करीत होते.

साधकांनी इस्पितळा मध्ये बाबांच्या सेवे करिता कोणी आणि कसे कुठल्या वेळेत हजर राहायचे ह्याचे सर्व नियोजन केले आणि त्याच प्रमाणे पूर्ण शिस्त सांभाळून गुरुसेवेचं कार्य सुरु झाले.

दिवसां मागून दिवस सरत होते आणि एके दिवशी महाराजांनी त्यांच्या मुलीला म्हणजे सौ. अनिला शेषराज माने ह्यांना हसत हसत सांगितले कि '' हे डॉक्टर मला काय बरे करणार माझी तर जायची तयारी झाली आहे''. पण त्याच दिवसांत दत्तजयंतीचा सप्ताह जवळपास होता. महाराज ह्या काळात गुरुचरित्राचे पारायण करीत असत पण आता प्रकृती बारी नसल्या मुळे ते शक्य नव्हते पण ते इस्पितळा मध्ये असून त्यांनी घरच्यांना आणि साधकांना स्पष्ट सांगितले कि मी जरी इस्पितळा मध्ये असलो तरीही दत्तजयंतीचा सप्ताह आणि उत्सव दर वर्षी प्रमाणे संपन्न झाले पाहिजे आणि त्यासाठी सर्व तयारी करा.

महाराजांच्या आदेशा प्रमाणे सर्व तयारी झाली आणि दत्तजयंतीचा सप्ताहाचा आरंभ झाला. रोजचे गुरुचरित्राचे पाठ बाबांच्या घरी त्यांची घरची मंडळी, ब्राह्मण गुरुजी आणि साधक करत होते, सायंकाळी आरती होत असे.

हळू हळू बाबांची प्रकृती खालावत चालली होती, त्यांच्या मूत्रपिंडावर परिणाम होत होता. डॉक्टर राजेश गायकवाड व इतर डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ट करीत होते पण कशालाही यश येत नव्हते. आता त्यांचे डायलेसिस सुद्धा सुरु झाले. काळजी खूपच वाढत होती.

माईंनी आणि मुलांनी विचार केला कि बाबांची तब्यात लवकर बरी व्हावी त्या करीत गणपती अथर्वशीर्ष ब्राह्मण गुरुजीं द्वारे दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ०९ डिसेंबर २००३ सकाळी करण्याचे नियोजीले. दत्तजयंतीचा दिवस उगविला आणि साधक परिवार दर्शनास येऊ लागले. बाबांचा धाकटा मुलगा अमित हे बाबांना भेटण्यास इस्पितळात गेले तेव्हा बाबा डोळे बंद करून शांत निजले होते. थोडी वाट पाहून अमित ह्यांनी बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला कि आज दत्तजयंती आहे आणि घरी उत्सव आहे, त्यावर बाबांनी लगेच धीम्या आवाजात उत्तर दिले कि ''हो माहित आहे मी तिथेच आहे''. हे ऐकल्यावर अमित समजले कि बाबा साधनेत आहेत आणि ते अदृश्यरूपात घरी उपस्तिथ आहेत म्हणून अमित बाबांना आणखी काही न बोलता तेथून घरी निघून आले.

सायंकाळी श्रीदत्त प्रभूंचा पाळणा उत्सव ही झाला. आलेले सर्व साधक सुद्धा बाबांची प्रकृतीची विचारपूस करीत होते आणि परमात्म्याकडे बाबांकरिता प्रार्थना करीत होते.

सोमवार ८ डिसेंबर २००३ बाबांच्या इच्छा आणि आदेशा प्रमाणे दत्तजयंतीचा सप्ताह व उत्सव पार पडला. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ९ डिसेंबर २००३ ला गणपती अथर्वशीर्ष कार्याची सर्व तयारी झाली होती. ब्राह्मण गुरुजी ही सकाळी यायचे पक्के झाले होते. अवकाश होता ती रात्र जायची आणि दुसरा दिवस उजाडण्याचा.ठरल्या प्रमाणे गणपती अथर्वशीर्ष कार्याची संपूर्ण तयारी केली गेली आणि ब्राह्मण गुरुजी ही वेळेत आले. कार्य सुरु होणार इतक्यात फोन वाजला आणि तो होता साधक श्री प्रवीण चव्हाण ह्यांचा कि बाबांची तब्येत फारच बिघडली आहे आणि बाबांना त्यांच्या वॉर्ड मधून दुसऱ्या विभागात घेऊन जात आहेत. तुम्ही लवकर या. बाबांचा थोरला मुलगा अजित हे गणपती अथर्वशीर्ष करावयास बसले होते तर धाकटा मुलगा अमित हे जलद गतीने इस्पितळात गेले. तिथे गेल्यावर बघितलं कि अनेक डॉक्टर प्रयत्न करत होते. बाबांना ताबोडतोब डायलेसिस वर ठेवले, शॉक ट्रीटमेंट देण्यात अली. तेथील उपस्तिथ असलेल्या मोठया डॉक्टरांना असे वाटले कि जे इस्पितळातले डॉकटर २१ नोव्हेंबर च्या रात्री होते आणि ज्यांना यश आले होते त्यांना लगेच बोलवावे आणि त्यांच्या हाताने उपचार करावेत. तसे हि करून पहिले बाबा व्हेंटिलेटरवर होते पण काही यश आले नाही. तेव्हा सकाळी ०९.०० वाजता डॉक्टरांनी घोषित केले कि बाबांनी प्राण सोडले.

बाबांनी आपला श्वास दत्तजयंती उत्सव पार पडे पर्यंत रोखले होते. जसे गणपती अथर्वर्शीर्षला सुरवात होणार तितक्यात त्यांनी आपले देहरूपी स्वरूप त्यागिले. बाबांनी जर अगोदर देह त्यागला असता तर दत्तजयंती उत्सवात खंड पडला असता, असे त्यांना कदापि होऊन द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी आपला श्वास रोखून ठेवला आणि मृत्यूला पुढे ढकलले.

जसे डॉक्टरांनी बाबांच्या मृत्यू घोषित केला तसाच पहिला फोन घरी करण्यात आला आणि ही अत्यंत दुःखद बातमी कळवली, हे समजल्यावर सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रत्येक साधक बंधू आणि भगिनींनी आपापल्या परिवारांना, मित्रांना आणि माहितीतल्या साधकांना कळविले.

बाबांचा देह त्यांच्या राहत्या घरी आण्यात आला आणि बघता बघता हि दुःखद बातमी सगळीकडे पसरली. साधकांची, नातेवाईकांची, इतर भाविकांची आणि गिरगांवातल्या रहिवाश्यांनी बाबांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी रीघ वाढू लागली.

दूर दूर हुन साधक मुंबई कडे निघू लागले पुणे, सातारा, कोल्हापूर, वाई, अलिबाग, चिपळूण, रत्नागिरी व अन्य ठिकाणं हुन.

सायंकाळी महाराजांचा देह घराच्या कंपाऊंड मध्ये दर्शनास ठेवण्यात आला आणि सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर फुलांनी सुशोभित केलेल्या ट्रकवर ठेवण्यांत आला आणि अंत्ययात्रेला सुरवात झाली. मरिन लाईन्स चंदनवाडी स्मशानभूमीत भडाग्नी देऊन कार्य करण्यात आले.

दशक्रिया विधी दादर स्मशानभूमीत करण्यात आली आणि बाबांचे अस्थी विसर्जन हरिहरेश्वरला करण्यात आले.

अस्थिविसर्जन करायला हरिहरेश्वरला जाताना सुद्धा एक सुंदर अनुभव बाबांच्या प्रचितीचा आला. बाबांची दोन्ही मुले दोन जावई काही मोजके साधक आणि नातेवाईक गाडीने हरिहरेश्वरच्या मार्गाला लागले. बाबांचे थोरले चिरंजीव अजित गाडी चालवत होते आणि धाकटे चिरंजीव अमित बाबांच्या अस्थी कलश घेऊन गाडीत मधल्या सीटवर बसले होते. प्रथम अमित ह्यांना सुंदर सुगंध अस्थी कलशा मधून येत आहे हे अनुभवले पण ते शांत राहिले. इतरांना हि हा मनमोहक सुगंध येत होता पण नक्की कोठून ते कळत नव्हते. अखंड यात्रेत हा सुगंध गाडीत बसलेल्यांचे मन प्रसन्न करीत होता. हरिहरेश्वरला पोहचल्यावर गाडीतून उतरल्यावर प्रथम साधक श्री विजय पवार ह्यांनी विचारले कि कोणी अत्तर किंवा पर्फुम लावलाय का तर सगळ्यांचे उत्तर होते नाही.... मग हा अप्रतिम मनमोहक सुगंध येतो कोठून तेव्हा अमित यांनी सांगितलं कि ह्या अस्थी कलशातून हा अप्रतिम मनमोहक सुगंध येत आहे. सर्व मंडळींनी अस्थी कलशाच्या जवळ येऊन खात्री केली आणि अस्थी कलशाला नमन करून अदभूत अनुभव आला आणि सर्व उपस्थित कृतज्ञ झाले. ह्याच अनुभवाने सर्व मंडळी मंत्रमुग्ध होऊन मुंबईला परतले.

ह्याच अर्थे महाराजांनी दर्शिवले कि जरी ते देहरुपात नसले तरी ते ह्या वातावरणात ह्या अप्रतिम मनमोहक सुगंधा प्रमाणे आजही वावरत आहेत. त्यांची शक्ती अजून हि कार्यरत आहे, त्यांची कृपा, प्रेम आणि मार्गदर्शन सदैव साधक आणि उपासकांच्या वर असते.

वर