प. पू. सद्गुरू श्री सिद्धयोगेश्वर घाग महाराज

प. पू. सद्गुरू श्री सिद्धयोगेश्वर घाग महाराज - माहिती पत्रक


मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी गुरूवार दि. १५. १२. १९२७ रोजी पूणे खडकी येथे महाराजांचा जन्म झाला. हा एक योगायोग होता. कांही वर्षांपूर्वी याच दिवशी एका साधूनी त्यांच्या आजोबांना भेट दिली होती. गुरूवार होता, महाराजांचे पाळण्यांतील नांव वसंत असे ठेवण्यांत आले. वसंताच्या आगमनाने सृष्टीमध्ये नवे चैतन्य निर्माण होवून सर्व सृष्टी आनंदाने भरुन जाते.


अधिक वाचा →


संग्रह







अनुभव


बाबांकडून दीक्षा देण्याची ईच्छा

श्री गुरु शरणम

मला असे वाटत होते की माझ्या प्रमाणे सुद्धा माझ्या सुनेला देखील बाबानी दीक्षा द्यावी. माझ्या मुलाचे लग्न मे २००३ साली झाले. मी माझी हि इच्छा बाबांना सांगितली. आमच्या घरातील सर्वजणांनी बाबांकडून दीक्षा घेतली आहे. माझ्या सुनेला देखील तुमच्याकडून दीक्षा मिळावी. बाबा म्हणाले दीक्षा देण्याचा दिवस असेल त्यावेळी मी तुला सांगेन.

बाबांकडून शक्तिपात दिक्षा

श्री गुरु शरणम

मी रमेश आंब्रे, श्री बाबांकडून शक्तिपात दिक्षा घेतल्यापासून त्यांच्या कडे माझे नियमीत जाणे येणे होते, दर गुरुवारी बाबांच्याकडे जाऊन त्यांचे दर्शन घेऊनच मी गोरेगावला माझ्या कारखान्यात जातं असे, काही कालावधी नंतर बाबा आजारी झाले, त्यांना हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये ठेवले होते, त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी तेथे गेलो, तेथे बाबांना पाहण्यासाठी बरीच गर्दी लोटली होती, त्यामुळे मला बाबांच्या जवळ जाता आलं नाही, मी त्यांना बाहेरूनच नमस्कार करून गोरेगावला कारखान्यात जाण्यासाठी निघालो, नमस्कार करत असतानाच वातावरणात मला एकदम सुगंध जाणवला, तो सुगंध मी गोरेगाव ला जाईपर्यंत होता.

माझी सद्गुरू माउली, माझ्या जीवनाची साउली

प.पु. श्री सद्गुरूंना विनम्र वंदन करून, मी उमाकांत अनंत सावंत माझे काही अनुभव आपल्या सोबत वाटून घेणार आहे.

माझे थोर भाग्य असावे म्हणूनच बाबांच्या निवासस्थानाच्या शेजारी आमचे कुटुंब वास्तव्यास होते. बाबांचे व माझ्या वडिलांचे चांगले मैत्रीचे संबंध होते, असेच एका रात्री जेवल्यानंतर त्या दोघांमध्ये संभाषण सुरु असता, माझ्या वडिलांनी श्री बाबाना विनंती केली की माझ्या मुलांना आपण आपल्या छात्र - छायेखाली घ्यावे. तर बाबानी त्यांस सुचविले की तुमच्या दोन मुलांना म्हणजे मी व माझी मोठी बहीण याना माझ्याकडे पाठवा, हे दोघांचे संभाषण मी ऐकत होतो आणि त्यानंतर बाबांकडे मी आकर्षित झालो.



अधिक अनुभव

संपर्क


आम्हाला कॉल करा किंवा ई-मेल पाठवा!

+९१-९८२०१८३५६८