अनुभव

साधनेतला अनुभव - ५ - १९ जानेवारी २०२१

आज बाबा आले आणि त्यांनी मला फक्त ' चल जाऊया' असे म्हणाले मला काहीच कळले नाही. पण काही क्षणातच मला जाणवले कि मी एक बर्फाचा डोंगर चढत आहे. पाय गुडघ्यापर्यंत बर्फातच होते. चढणे अतिशय कठीण होते. श्वास लागला होता, कधी कधी तर श्वास घेताच येत नव्हता तेवड्यात बाबांचा आवाज आला ' बयो चड मी आहे आपण कैलासावर चाललो आहोत.

माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. कैलास पर्वत!.....

अधिक वाचा →

श्री गुरु शरणं

प्रत्येक क्षणी बाबांचे आशीर्वाद आमच्या परिवारावर आहेत. नुकत्याच झालेल्या पहिल्या लोकडाऊन मधला अनुभव. आम्ही मुलुंड पूर्वेला राहात होतो. पण त्या जागेची ओ. सी. नव्हती. महत्वाची सरकारी कागदपत्रे देखील नव्हती, म्हणून ती जागा बदलण्याचा आम्ही विचार केला. कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला ती जागा कमी भावात विकावी लागली. दुसरीकडे नवीन जागा घेताना भाव जास्त असल्याने आम्हाला जास्त कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे त्याचे हप्ते ही मोठया प्रमाणात होते. नवीन जागा घेऊन एक वर्ष झाले होते. दोन कारखान्या पैकी एक कारखाना विकून कर्ज फेडण्याचा विचार आम्ही केला. एक वर्षांपासून आम्ही कारखाना विकण्यासाठी आम्ही धडपडत होतो. सर्वाना खूप चिंता वाटत होती, एवढे मोठे हप्ते भरायचे कसे? एक वर्ष झाले तरी कारखाना विकला जात नव्हता.

अधिक वाचा →

साधनेतला अनुभव - ४ - १९ एप्रिल २०१८

आजचा अनुभव पण खूप दिव्य होता आणि खूप घाबरावणारा पण ....

आज खूप मोठी महाकाय कालिका माता दिसली खूप विराट आणि उग्र रूप होते ते. तिला बघून खूप घाबरले मी. तोच माझ्या डोक्यावर गुरूंचा हात आणि त्यांचे शब्द ' बायो उठू नको घाबरू नको. बस ' ते मला उठू देत नव्हते. कालिका माता दोन्ही हाताने माझ्या डोक्यावर अग्नी वर्षाव करीत होती. मी डोळ्यावर हात ठेऊन रडत आणि ओरडत होती. डोक्यातून खूप झिणझिण्या येत होत्या. मी पूर्णपणे थरथरत होते. पण सद्गुरू मला खाली बसवत होते. हे किती वेळ चालू होते? ते काही माहित नाही. पण थोड्याच वेळेत कालीमातेच्या डोळ्यात प्रेम आणि शांतता दिसली. तिने माझे दोन्ही हात तिच्या हातात घेतले. ती हसत होती पण माझे अश्रू थांबत नव्हते. साधनेनंतर मी उठून बसले, मी पूर्ण सुन्न झाले होते शरीर थरथरत होते. मला ह्या अनुभवाने खूप कंफ्युझन (गोंधळ) झाला होते.

अधिक वाचा →

अदभूत अनुभव - आज्ञाचक्रात तेजोमय ज्योतीचे (प्रकाशाचे) दर्शन

आनंदमय आल्हादायक स्वरूपांत काही काळ गेला कारण राधारूपी अल्हादायी शक्ती माँ कुंडलिनी गुरुंच्या संकल्पाने जागृत झाली होती. भानावर आल्यानंतर सारे अदभूत होते ह्याची अनुभूती शब्दांत वर्णन करणे कठीण.

रोजची दैनंदिक दिनचर्या उरकून साधनेला कधी बसतो असे व्ह्याचे.

अधिक वाचा →

साधनेतला अनुभव - ३ - ९/४/२०१८

आज सोमवार सुट्टीचा वार त्यामुळे उशिरा उठले. साधनेची वेळ थोडी पुढे गेली पण चुकली नाही.

बराच वेळ साधना होते खूप बरे वाटते दिवस खूप आनंदात जातो.

आजचा पण अनुभव खूप सुंदर आणि अद्भुत होता. आज दत्त महाराजांचे दर्शन झाले, त्यांच्या मागे गाय उभी होते आणि पुढे दोन कुत्रे होते. दत्त महाराजांची तिन्ही चेहरे माझ्या सद्गुरुंचे होते. ते पाहताच मी आपोआपच म्हणाले

अधिक वाचा →

बाबांच्या आशीर्वाद

श्री गुरु शरणम

बाबांची आमच्या परिवारावर अपार कृपा असल्याचा आणखी एक अनुभव. बाबांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य झाले नसते. २०१० साली हि घटना माझा नातू पावणेदोन वर्षाचा होता. तो आईच्या दुधावर पूर्णपणे अवलंबून होता. मी सुनेला म्हणाली की आता त्याला दूध पाजणे बंद कर. आठ ते दहा दिवसातच त्याची दूध पिण्याची सवय मोडली.

अधिक वाचा →

साधनेतला अनुभव - २ - ३० मार्च २०१८

आज पुन्हा साधनेला बसले ठरलेल्या वेळेलाच. वेळ शक्यतो चुकवत नाही. साधनेत वेळ समजत नाही. पण सगळं हरवून एकाग्र होते पण थांबून थांबून मध्ये मध्ये भानावर येते, परत भान हरपते.

अधिक वाचा →

परम पूज्य श्री सिद्धयोगेश्वर महाराजांचा आम्हाला आलेला अनुभव

परम पूज्य श्री सिद्धयोगेश्वर महाराजांचा आम्हाला आलेला अनुभव.

माझ्या दादाचे लग्ना १९९७ साली झाले. तेव्हा माझी वाहिनी सुभद्रा आंब्रे व तिचे आई बाबा ह्यांच्याकडून आमचा बाबांशी परिचय झाला.

अधिक वाचा →

साधनेतला अनुभव - १ - सद्गुरू दृष्टांत

११ डिसेंबर २०१८ आज सद्गुरुंचे (बाबा) दर्शन झाले. पांढरा झब्बा, गळ्यात दोन रुद्राक्षांच्या माळा, पांढरे धोतर असा नेहमीचा वेष. चेहरा हसरा आणि तेजस्वी ते रूप पाहून मी स्वतःला रोखूच शकले नाही डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. रडतच मी विचारले 'बाबा असे आम्हाला सोडून कुठे गेलात? मी साधनेला बसते ते तुम्हाला सांगायचे आहे असे अर्ध्या रस्त्यावर सोडून का गेलात बाबा?

अधिक वाचा →

इच्छापूर्ती

' जे जो वांछील ते ते लाहो प्राणिजात ! '. या ओळी प्रमाणे मी जी जी ईच्छा बाबांजवळ सांगितली ती सर्व त्यांनी पूर्ण केली. एखादे लहान मूल आपल्या आई जवळ एखादी गोस्ट मागते व ती माउली ती देण्याचा प्रयत्न करते. त्याप्रमाणे बाबांनी माझ्या सर्व ईच्छा पूर्ण केल्या. खरोखर बाबा माझ्यावर व माझ्या परिवारावर आभाळाएवढे आशीर्वाद देत आहेत. बाबांचा प्रत्यय जाणीव,अस्तित्व प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला जाणवते. त्यांचे अनुभव कितीही सांगितले किंवा लिहिले तरी कमीच पडतील. त्यातील आणखी एक अनुभव.

अधिक वाचा →

सुरक्षा - बाबांची कृपा

सुरक्षा - बाबांची कृपा

१ मे २००६, आम्ही वापी (गुजरात) येथे शिफ्ट झालो. माझा मुलगा योगीराज (हे नाव ही बाबांनी दिले) चौथी मध्ये होता. आमचा दरवर्षी गुरुपौर्णिमेला जायचा नेमच होता. त्याप्रमाणे रेल्वेचे तिकिट काढले होते.

अधिक वाचा →

येथे कर माझे जुळती

अगदी आत्ताची जुलै २०२० ची सत्य परिस्थिती कथन करताना डोळे पाणावल्या शिवाय राहत नाहीत, कारण आपले सद्गुरू हे शिष्याची कशी काळजी घेत असतात, त्याचे अगदी अलीकडील उद्धरण देऊ इच्छितो.

अधिक वाचा →

श्री सद्गुरूमय होऊया, मुक्तीची अनुभूती घेऊया

श्री गुरु शरणम

ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि उद्गारलो श्री गुरुकृपेने, खरंच माउलींच्या ह्या ओवींची अनुभूती मी प्रत्यक्ष माझ्या जीवनात घेतली आहे, माझ्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर माझ्या सद्गुरूंनी "श्री सिद्धयोगेश्वर महाराजांनी "त्यांच्या कृपाशिर्वादाचा वर्षाव करून माझं जीवन कृतकृत्य केलं.

अधिक वाचा →

माझी सद्गुरू माउली, माझ्या जीवनाची साउली

प.पु. श्री सद्गुरूंना विनम्र वंदन करून, मी उमाकांत अनंत सावंत माझे काही अनुभव आपल्या सोबत वाटून घेणार आहे.

माझे थोर भाग्य असावे म्हणूनच बाबांच्या निवासस्थानाच्या शेजारी आमचे कुटुंब वास्तव्यास होते. बाबांचे व माझ्या वडिलांचे चांगले मैत्रीचे संबंध होते, असेच एका रात्री जेवल्यानंतर त्या दोघांमध्ये संभाषण सुरु असता, माझ्या वडिलांनी श्री बाबाना विनंती केली की माझ्या मुलांना आपण आपल्या छात्र - छायेखाली घ्यावे. तर बाबानी त्यांस सुचविले की तुमच्या दोन मुलांना म्हणजे मी व माझी मोठी बहीण याना माझ्याकडे पाठवा, हे दोघांचे संभाषण मी ऐकत होतो आणि त्यानंतर बाबांकडे मी आकर्षित झालो.

अधिक वाचा →

बाबांकडून शक्तिपात दिक्षा

श्री गुरु शरणम

मी रमेश आंब्रे, श्री बाबांकडून शक्तिपात दिक्षा घेतल्यापासून त्यांच्या कडे माझे नियमीत जाणे येणे होते, दर गुरुवारी बाबांच्याकडे जाऊन त्यांचे दर्शन घेऊनच मी गोरेगावला माझ्या कारखान्यात जातं असे, काही कालावधी नंतर बाबा आजारी झाले, त्यांना हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये ठेवले होते, त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी तेथे गेलो, तेथे बाबांना पाहण्यासाठी बरीच गर्दी लोटली होती, त्यामुळे मला बाबांच्या जवळ जाता आलं नाही, मी त्यांना बाहेरूनच नमस्कार करून गोरेगावला कारखान्यात जाण्यासाठी निघालो, नमस्कार करत असतानाच वातावरणात मला एकदम सुगंध जाणवला, तो सुगंध मी गोरेगाव ला जाईपर्यंत होता.

अधिक वाचा →

बाबांकडून दीक्षा देण्याची ईच्छा

श्री गुरु शरणम

मला असे वाटत होते की माझ्या प्रमाणे सुद्धा माझ्या सुनेला देखील बाबानी दीक्षा द्यावी. माझ्या मुलाचे लग्न मे २००३ साली झाले. मी माझी हि इच्छा बाबांना सांगितली. आमच्या घरातील सर्वजणांनी बाबांकडून दीक्षा घेतली आहे. माझ्या सुनेला देखील तुमच्याकडून दीक्षा मिळावी. बाबा म्हणाले दीक्षा देण्याचा दिवस असेल त्यावेळी मी तुला सांगेन.

अधिक वाचा →

श्री. सद्गुरू सिद्धयोगेश्वर महाराजांना कोटी कोटी प्रणाम

परम पूज्य गुरुवर्य सिद्धयोगेश्वर महाराजांची शक्तिपात दीक्षा मिळण्याचा योग आम्हा आंब्रे कुटुंबियांना इ. स. १९९९ ते २००० साली आला.

आम्ही आंब्रे कुटुंबीय माझ्या बाबांच्या जन्मापासून गिरगांव ६वा कुंभारवाडा येते राहत होतो. म्हणजे सिद्धयोगेश्वर महाराजांच्या घरा पासून फार तर ३ ते ४ किलोमीटर वर म्हणायचे तर आमचे वास्तव्य होते. परंतु इतक्या वर्षा पासून राहणे असूनही आम्हाला बाबानंबदल काही कल्पना नव्हती. माझ्या दादाचे १९९७ साली लग्न झाले,माझी वाहिनी सौ. शुभदा राजेश आंब्रे ही बाबांची बऱ्याच वर्षांपासून साधक होती. ती व तिच्या कुटुंबियांना मुळे आम्हाला बाबांबद्दल माहिती कळली, व पुढील १ ते २ वर्षात आम्हाला देखील बाबांकडून शक्तिपात दीक्षेचा लाभ झाला.

अधिक वाचा →

परम पूज्य बाबांना सतःश प्रणाम

श्री. गुरु शरणं

इ. स. १९९८ ची गोष्ट आहे. माझ नुकतच लग्न झाले होते. लग्नाच्या आधी पासून मी चर्नी रोडला कामाला होते. तेव्हा मी नेहमी बाबांना भेटायला मी जात असे. लग्नानंतर हि मी जात होते. सासरी वातावरण थोडं वेगळ असल्यामुळे मला नेहमी टेन्शन येत असे. असल्या वातावरणची सवय नसल्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटत असे आणि त्यातच मला दिवस गेले होते.

अधिक वाचा →

श्री गुरु शरणम

श्री गुरु शरणम

मी सौ. सुषमा आंब्रे, माझ्या गुरुमाऊलीची मला आलेली अनुभूती कथन करत आहे, "दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, ह्या उक्तीची प्रचिती मी माझ्या जीवनात घेतली आहे, आपल्या जीवनामध्ये आपलें सद्गुरू कोण असणार हे आधीच ठरलेले असते, याची प्रचिती मला आली, माझी बहीण सौ. सुधा हिने तिच्याच गुरूंची दिक्षा घेण्याचा आग्रह केला होता, मी त्यांच्या दर्शनालाही चार, पाच वेळा गेले होते, एक दिवस अनुग्रह घेण्याच्या उद्देश्याने नारळ पेढे घेऊन रांगेत उभे होते, माझी बहीण तेथे स्वयंसेविका असल्याने ती मला रांगेतून पुढे येण्याचा आग्रह करत होती, परंतु माझे पाय जमिनीवरून हलतच नव्हते, शेवटी दिक्षा देण्याची वेळ संपली, मी दिक्षा न घेताच तशीच घरी परतले.

अधिक वाचा →

श्री गुरु शरनं

श्री सद्गुरू घाग महाराज उर्फ बाबा यांच्या बदल लिहावे तेवढे कमीच आहे, कारण माझ्या आयुष्यात एका कठीण प्रसंगी मला बाबांनी जीवनदान दिले आहे.

मी मिलिटरी इंजिनेर सर्विसेस मध्ये कमला आहे. १९९० मध्ये मला अचानक टायपिंगच्या कामामुळे मानेचा त्रास सुरु झाला. त्या आधी माझ्या पायाचा ऍसिडन्ट झाला होता. १९८१ मध्ये मी मानेसाठी ऑफिसच्या डिस्पेंसरीतून औषधे आणायची त्याने तात्पुरते बरे वाटायचे परत मान खूप दुखायचे. त्यानंतर एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी माझ्या मानेची ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर मान जास्तच स्टिफ झाली.

अधिक वाचा →

बाबा ! बाबा !

श्री गणेशाय नमः

श्री गुरु शरणम

बाबांच्या आशीर्वादाने, कृपेमुळे माझ्या जीवनाला खरा मार्ग सापडला. बाबा सदैव मला मार्गदर्शन करतात. बाबांबद्दल लिहायला माझे शब्द अपुरे पडतात. एकही क्षण असा नाही की, त्यांची मला अनुभूती होत नाही. ते सतत माझ्या व घरातील सर्व कुटुंबियांच्या सोबत असल्याचा आम्हाला प्रत्यय अनुभव येतो.

अधिक वाचा →

ॐ गुरुवे नमः

माझी आई, बहीण आणि भाऊ ह्यांच्या पाठोपाठ सन १९९०

बाबांनी मला गुरुमंत्र देऊन दीक्षा दिली. तिथूनच माझा शिष्य म्हणून प्रवास सुरु झाला. ऑफिसवरून निघाल्यावर नित्य नियमाने सद्गुरुंचे दर्शन घेणे सुरु झाले. बाबा आपल्या भक्तांना नेहमीच प्रवचन, उपदेश करीत असत आणि योगायोगाने बऱ्याचदा त्यातूनच मला माझ्या प्रश्नांची उत्तरे सापडत असत. आज अनेक वर्षानंतर लोकांसमोर आपले अनुभव मांडण्याची सुवर्णसंधी मिळताच एक ना अनेक असे कित्येक बाबांचे प्रसंग आणि चमत्कार मनात उचंबळत आहे. त्यापैकीच आलेला असलेला हा विलक्षण अनुभव.

अधिक वाचा →

श्री गुरु शरणम

साल १९८८ रविवार त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. माझा व माझी मुलगी रेश्मा आमचा दोघींचाही उपवास होता. पण मला नेमकी अडचण आली. त्यामुळे मी देवाची पूजा करू शकले नाही. नित्य दिवशी साबुदाणा खिचडी बनवली होती. रेश्मा त्या वर्षी दहावी च्या वर्षाला होती. ती मला म्हणाली मी मेत्रीणींकडे जाऊन गाईड घेऊन येते. मी तिला घरी लवकर पार्ट यायला सांगितले.

अधिक वाचा →

शिष्यावर कृपा

नानासाहेब म्हापूसकरांच्या पोटावरील शस्त्रक्रिया, सावंताच्या डोक्यावर जबर मार बसून आलेले अंधत्व किंवा देसाईची विशिष्ठ अवस्था या बाबत पू. बाबांच्या कृपेनेच सर्वांचे कल्याण झाले. नानांच्या शस्त्रक्रियेच्याच विषयी आलेले गंडातर केवळ पू. बाबा होते म्हणूनच दूर झाले. तर सावंतास नित्य साधनेमुळे दिसू लागले. देसाईच्या अवस्थेत ही बराच फरक पडला व नित्याचे व्यवहार ते स्वत: पाहू लागले. पण २० जुलै १९७८ गुरुपोर्णिमेच्या दिवशीचा प्रसंग म्हणजे एक आगळाच ठरला.

दादा कार्लेकर यांची सद्गुरुवर एवढी अपार निष्ठा जेवढी कल्याणाची श्री समर्थावर. दीक्षेपूर्वी दादा म्हणजे पंढरीचे वारकरी पण दीक्षेनंतर हे सर्व बदलून गेले. पंढरीस पांडुरंगाच्या दर्शनास ते ज्या निष्ठेने जात असत तेवढीच निष्ठा आता सद्गुरूचरणी जडली. गुरुपोर्णिमेचा दिवस हाच आपला शेवटचा दिवस याची जाणिव ५-६ दिवस पूर्वीच त्यांना दृष्टांत ने झाला होती पण कोणास न सांगता पत्नीस ५ दिवस नंदादिप ठेव अशी सूचना केली. गुरुपोर्णिमा उत्सवाची ...

अधिक वाचा →

एक चमत्कार

पू. बाबांच्या सान्निध्यात असणाऱ्याना व शिष्याना अनेक अनुभव येतात. चमत्काराविषयी बाबांना कोणी काही विचारले तर चमत्काराविषयी उदासीन दिसणारे बाबा म्हणजे हे एक महायोगी आहेत हेच दिसून येते.

डोंबिवलीच्या गजानन वस्तू भांडारचे मालक श्री. तात्या जोशी हे. पू. बाबांचे निस्सिम भक्‍त. दर सोमवारी ते दर्शनास येत पण ओळीने दोन सोमवार त्यांना दर्शनास येणे जमले नाही. मग पु. बाबांनी जवळचेच एक शिष्य श्री दादा कार्लेकर यांना फोनवरून त्यांची चौकशी करण्यास सांगितले. परन्तु दादा फोन करणेंस विसरले. तिसरे दिवशी पुन्हां पू. बाबांनी दादास विचारले, "फोन केला कां?" तेव्हां दादा म्हणाले आता फोन करून येतो. परन्तु पु. बाबा म्हणाले, "आता फोन करण्याची आवश्यकता नाही. ते संध्याकाळी येतील", आणि तात्या पू. बाबांच्या दर्शनासाठी आले. दर्शन घेऊन झालेवर पू. बाबांनी तत्यांना दादांची भेट घेण्यास सांगितले. त्या प्रमाणे तात्या दादांच्या भेटीस गेले. तात्याना पाहून दादाना एकदम आश्‍चर्य वाटले. दादानी सांगितले, "चला दर्शनास जावू या, बाबाही तुमची ...

अधिक वाचा →

सगुण आणि निर्गुणातील फरक दाखवून देणारे प.पू. श्री सिद्धयोगेश्वर महाराज

परम पूजनीय सद्गुरु सिद्धयोगेश्वर महाराजांकडून अत्यंत सामर्थशाली अशी शक्तिसंचार दिक्षा प्राप्त होईपर्यंतची एका अज्ञानी जीवाची भ्रमंती याचे थोडक्यात वर्णन खाली देत आहे.

सुखाच्या प्राप्तीसाठी प्रत्येकाची धडपड जीवनभर सुरु असते. परंतु सुखाच्या चुकीच्या कल्पनेप्रमाणेच त्याच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयन्तही काळाच्या ओघात नामशेष होऊन जातात व सत्य, शाश्वत असे सुख मिळू शकत नाही. खरे सुख प्राप्त करावयाचे असेल तर संत-सदगुरुंकडेच जायला हवे, की जे आपणांस अप्रतिम सुखाचा मार्ग दाखवितात. ...

अधिक वाचा →

शब्दांच्या पलिकडे

अनंत कोटी ब्रम्हांडनायकाने असंख्य जीव निर्माण केले. या सर्व जीवांमध्ये मनुष्यप्राणी सर्वश्रेष्ठ गणला जातो कारण इतर प्राण्यांपेक्षा ज्ञानशक्ती, विचारशक्ती निसर्गत:च मनुष्याला प्राप्त झालेली आहे. या प्राप्त झालेल्या सर्वश्रेष्ठ योनीत आपले सार्थक साधून घेतले नाही तर परत त्याला लक्षावधी योनीत फिरावे लागून असंख्य यातना भोगाव्या लागतात. अशा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारा कोणता मार्ग आहे, तर परमेश्वर प्राप्ती शिवाय याला दुसरा मार्ग नाही, पण परमेश्वर प्राप्त कसा होणार, या विचाराने मन भांबावून गेले.

मला समजले सद्गुरूवाचून माणसाला परमेश्वर प्राप्ती नाही. म्हणून मी सद्गुरूंच्या शोधात बऱ्याच ठिकाणी गेलो. लौकिदृष्टया गुरू म्हणून मी पुष्कळ माणसे पाहिली. परंतु माझ्या मनाचे ते समाधान करू शकले नाहीत. ...

अधिक वाचा →

पुनर्जन्म

"
 गुरूब्रहमा गुरूविष्णु गुरूर्देवो महेश्वरा:
 गुरू साक्षात परब्रहम तस्मै श्रीगुरूर्वे नम:

हा लेख लिहायला घेतला खरा पण काय लिहू? मी किती लिहू? तरी पण अडीच वर्षाच्या कालावधीत आलेली दिव्यत्त्वाची प्रचिती वाचकांसमोर मांडण्याचा मूक आणि छोटासा प्रयत्न करते.

 जिथें वेदही म्हणती नेती नेती |
 तो गुरू महिमा वर्णावा किती |
तर तेथे माझी सामान्याची शक्ती पुरेल कैसी? ...

"अधिक वाचा →

महान अनुभूती ही दिव्य कृपेची

"तुमच्या आतडय़ांला भोके पडली असून परफोरेशन सुरू झाले आहे. पण काळजी करू नका. कुर्डुवाडी येथील अत्याधुनिक वैधकीय उपकरणे असलेल्या दवाखान्यात तुमच्यावर उपचार केले जातील घरी निरोप दिला आहे व जीप पाठविली आहे."

करमाळा येथील एका प्रेमळ वैद्यकीय अधिकारी मित्रांनी दुपारी चार वाजता वरीलप्रमाणे रोगनिदान करून मला शाब्दिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला व मला काही काळ एकांतात सोडून बाहेर निघून गेले. या एकांतातच मला श्रीमद् सिद्धयोगेश्वर महाराज, माइयावर कमालीचे प्रेम करणारे माझे गुरूदेव यांच्या दिव्य कृपेची महान अनुभूती आली जिला वर्णिता अश्रु पराकाष्ठेने आवरावे लागत आहेत.

मी करमाळा येथे लघु पाटबंधारे कार्यालयांत उपविभागीय अभियंता म्हणून दीड वर्षापूर्वी ...

अधिक वाचा →

गुरुविण देव नाही दुजा.....

गुरूचरित्राचे पारायण संपवून आरतीसाठी उभा राहिलो तोच एक गृहस्थ दरवाजांत आले. खुणेनेच त्यांना बसण्यासाठी सांगून मी आरती करून घेतली. त्या अनोळखी गृहस्थाची ओळख करून घेतली. "आपण कोण? कुठून आलांत?" पण त्या गृहस्थाचे लक्ष पोथीकडे लागून राहिले होते. त्यांनी माझ्या प्रश्नाचे बऱ्याच वेळाने उत्तर दिले, "मी आवळे, घाटकोपरला रहातो. तुमच्या प्रोजेक्टसाठी माझ्याकडे ग्रुप बुकींग आहे." मी लगेच त्या संदर्भात बोलणी करून ते गृहस्थ जायला निघाले. जातां जातां त्यांनी मला विचारले, "एक विचारू कां?" त्यावर मी म्हणालो, "विचारा, जरुर विचारा." "तुम्ही हे गुरूचरित्र पारायण केव्हांपासून करता?" त्यावर मी म्हणालो, "तरी सात आठ वर्षे झाली असतील." त्यावर ते म्हणाले, "तुम्ही गुरुदिक्षा घेतली आहे काय?" "नाही. मला गुरुदिक्षा घ्यायची फार इच्छा आहे पण माझ्या पहाण्यांत योग्य अशी असामी आलेली नाही. मी खूप हिंडलो, पण माझे समाधान झालेले नाही. आणि जो पर्यंत मला योग्य गुरुची भेट होत नाही तोपर्यंत मी गुरू करणार नाही. अर्थात गुरू ओळखण्याची पात्रता माइयांत ...

अधिक वाचा →

बाबांच्या मंत्रशक्तीची किमया

मी आणि माझे कुटुंब बाबांचे गेली दहा वर्षे साधक आहोत. त्यावेळेपासून आजपर्यंत केव्हांही न चुकता बाबांची आठवण काढल्याशिवाय किंवा बाबांच्या प्रतिमेला हात जोडल्याशिवाय माझा दिनक्रम सुरू होत नाही. घराच्या बाहेर पडताना सुध्दा मी बाबांच्या प्रतिमेला हात. लावल्या खेरीज बाहेर पडत नाही. असो.

१९८० सालातील गोष्ट. माझ्या आईचे वय त्यावेळी अंदाजे ७५ वर्षे असेल. तिला मधून मधून रक्तदाबाचा विकार उद्भवत असे. ते दिवस थंडीचे होते. रात्री आठ-साडेआठ वाजता जेवण करून बसलो होतो. तोच माइयाशेजारी रहाणारे सद्गृहस्थ ज्यांच्याकडे टेलीफोन आहे त्यांनी मला सांगितले की, "तुझा नाशिकहून फोन आला आहे." मी लगेच फोन घेतला तर माझी आई फारच आजारी आहे तरी तू ताबडतोब गावी ये, असे मला सांगण्यात आले. मी फारच घाबरून गेलो. नाशिकला जाण्यासाठी मला ...

अधिक वाचा →

गुरु माऊलीच्या मंत्राचा माहिमा

सन १९८२ ची गोष्ट. मी माझ्या कुटुंबासह मे महिन्यात माझ्या पुतणीच्या लग्नानिमित्त गावी गेलो होते. लग्न आमच्या गावातच होणार असल्यामुळे लग्नाच्या एक दिवस अगोदर वराला लग्नस्थळी घेऊन येण्याची प्रथा होती. त्यासाठी माझ्या थोरल्या भावाने मला असे सांगतले की घरात बरीच कामे करायची आहेत. तेव्हा तू व चिरंजीव शिवाजी | माझा छोटा पुतण्या | वराच्या गावी जाऊन त्यांना घेऊन या. मी त्यांना माझी अडचण अशी सांगितली की सदर गाव कोणत्या भागात आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. तेव्हा अशा अनोळखी ठिकाणी मी कसा जाऊ शकणार. परंतु घरातील प्रत्येक माणसाला लग्नानिमित्त अनेक कामे असल्यामुळे कोणीही जाण्यास तयार नव्हते. भावाने मला जाण्याच्या ठिकाणचा पत्ता व कसे जायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली. वराचे गाव आडवळणी ठिकाणी असणारे एक छोटे गाव होते. तेथे जाण्यास प्रथम नासिक ते सायखेडा | बाजाराचेगाव | असे जावे लागले. सायखेडयावरून संध्याकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान महाजनपूर | वराचे गाव | येथे एस. टी. जात असे. परंतू नेमकी ...

अधिक वाचा →

एक असाही अनुभव

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे उद्दगार मराठी वाड्मयांत एका कविने काढलेले आहेत. परंतु मी मात्र या जगात भिकारी आहे असे मनाला लावून घेणार नाही. कारण सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष साक्षात ईश्वर होय. त्या ईश्वररूपी सद्गुरूंच्या सानिध्यात मला माझ्या पतिसमवेत वावरण्याची संधि मिळत आलेली आहे व पुढील काळातही गुरूकृपेने मिळो ही गुरूचरणी प्रार्थना.

८ ऑगष्ट १९८५ रोजी बाबांचा वार गुरूवार होता. ऑफिसमध्ये मी माझ्या कामात मग्न होते. संध्याकाळी चार वाजता अचानक माझ्या शरीरात एक वेगळीच संवेदना निर्माण झाली व हृदयांत भितीने थरकाप सुरू झाला. मला वाटू लागले कि मला हृदयविकाराचा झटकाच येत आहे कि काय? हया विचारात साडेपाच वाजले व आंम्ही उभयता ऑफिसमधून बाहेर पडलो नियमाप्रमाणे सद्गुरूंच्या दर्शनाला गुरूवार म्हणून गिरगांवची वाट धरली. गुरूंच्या गुरूप्रसादांत भक्तांची रीघ सद्गुरूंच्या दर्शनाला ...

अधिक वाचा →

एक नवा अनुभव

महाराजांच्या म्हणजेच माझ्या पतीच्या चमत्कारापैकी अलीकडेच घडलेल्या एका विलक्षण चमत्काराची गोष्ट आज मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

माझे पती म्हणजे सिध्दयोगेश्वर महाराज | इतर कांही लोक त्यांना बाबा म्हणतात. 3 वर्षापूर्वी एके दिवशी ते ध्यानावस्थेत, शांत मुद्रेत बसले होते. त्याच अवस्थेत त्यांनी मला "गिताई" म्हणून हाक मारली-हाक ऐकून मी चकीत झाले. कारण ते मला नेहमी "गिता" किंवा "लिला" म्हणत. मी विचारले. काय? तेव्हां ते म्हणाले मी जर आजारी पडलो तर, कोणी भविष्यकार माइ्या मरणावदृदल तारखा देतील. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नको | माझ्या पत्रिकेप्रमाणे साडेसाती आहे. तेव्हां मला मृत्यू घेऊन जाऊ शकणार नाही. काही लोक सांगतील की "त्यांनी कमावलेली सर्व शवित दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी खर्च केली, म्हणून त्याचे भोग त्यांना भोगावेच लागतील. त्यांचा मृत्यू होईल | तर, लक्षात ठेव | पंचमहाभुतात्मक ...

अधिक वाचा →

नाशिकचा अनुभव

असेच, एके दिवशी ते मला म्हणाले, की उद्या नशिकला जायचे आहे, तूही बरोबर चल. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे तीन्ही मुलांना बरोबर घेवून नाशिकला गेलो. तिथे मुंबईच्या त्यांच्या एका ओळखीच्या गृहस्थांचा रिकामा बंगला होता. तो त्याने आम्हांला रहाण्यासाठी दिला. हा प्रशस्त बंगला तसा मध्य वस्तीतच होता. त्या दिवशी आम्ही गोदावरीवर स्नान करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले, व परत बंगल्यावर आलो. दुपारनंतर आम्ही बाहेर असे पडलोंच नाही. तिथे जेवणासाठी भांडी व स्टोव्ह होता. मी सकाळच्या जेवणांत फक्त डाळभात केला होता. दुपारी जेवणे झाली. मी आराम करण्यासाठी आडवी झाले. महाराज कसले तरी पुस्तक वाचीत बसले होते. संध्याकाळी इतर देवळात जावून दर्शन घेतले, व घरी आलो. रात्रौ 9 च्या सुमारास जेवणे झाली. महाराज मला म्हणाले आता तू झोप - सकाळी आपल्याला त्रम्बक्रेश्वरला जायचे आहे. मी मुलांना घेवून झोपी गेले. सबंध दिवसाच्या श्रमामुळे मला लवकरच झोप लागली. हे सुभगे जागी हो | हे शब्द कानांवर पडतांच मी खडबडून जागी झाले. आसमंतात निरव शांतता पसरली ...

अधिक वाचा →

योगीनी अम्मा यांच्या कुटीतील अनुभव

पूजनीय योगीनी लक्ष्मी अम्मा ही एक रमणमहर्षिंची शिष्या होती. महर्षिंची समाधी कालानंतर त्या स्वामी नित्यानंदाच्या दर्शनाला आल्या. काही दिवस वज्रेश्वरी राहिल्यानंतर त्या ज्या कोठे गेल्या ते कोणाला कळलेच नाही. एक दिवस त्यांचे चांदीप जवळील तुंगारेश्‍वराच्या जंगलात वास्तव्य असल्याचे महाराजांना समजले. त्यानी मला सांगितले कि उद्या पहाटेच मी लक्ष्मी अम्माला भेटण्यासाठी जाणार आहे. रात्री येण्यास उशीर होईल. त्याप्रमाणें ते लक्ष्मी अम्माला भेटूनही आले ५-६ विवसानंतर एक दिवस मला म्हणाले कि, "लक्ष्मी अम्माच्या दर्शनाला तूही चल." मला खुप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी आमच्या दोन्ही मुलीना बरोबर घेवून | निघालो. त्यावेळी उज्वला ६ वर्षांची असेल व अनिला दीड वर्षांची. मुंबईहून वज्रेश्‍वरीला निघालो. वज्रेश्‍वरीला जातांना मध्येच चांदीप हे गांव आहे. आम्ही ज्यावेळी मोटारीतून उतरलो तेव्हां रिमझिम पाऊस पडत होता. रस्ता असा नव्हताच. शेताच्या बांधावरून अरुंद व खाच-खळग्यातून आपला तोल सांभाळून चालावे लागत होते. उज्वलाला महाराजांनी उचलून घेतले होते, अन्‌ मी ...

अधिक वाचा →

आईंना आलेले अनुभव -त्यांच्याच शब्दांत

महाराजांच्या वैरागी वृत्तिमुळे म्हणजे वडिलांच्या मालमत्तेतील कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा नव्हत्या. त्यांच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवरच घरसंसार चालवावा लागत असे. माझ्या संसारांत त्यावेळी आम्ही तिघे म्हणजे महाराज, मी व माझी मुलगी उज्वला, तसेच कोणाचाही आसरा नसलेली माझी बहीण शांता व वडील दिरांचा चि. अविनाश असे पाच जण होतो. परिस्थिती नाजूकच होती. बहुतेक तो दिवस रजेचा असावा, दुपारी जेवण झाल्यावर महाराज वामकुक्षी घेत होते. मीही काम आटोपून त्यांचे पाय चेपीत बसले होते. मनांत विचारांची चक्रे चालू होती की आपल्या संसाराचे, आपले कसे होणार? या सर्व सामान्य स्रीच्या मनांत येणाऱ्या प्रमाणे, मी सहजच त्यांना म्हणाले की, आपण परमेश्‍वराची एवढी भक्ति करता, मग आपली परिस्थिती अशी का? त्यांनी किंचित डोळे उघडले व मला म्हणाले की, "पैसा मिळून आपली परिस्थिती सुधारावी म्हणून का आपण परमेश्वराची भक्ति करतो?” या त्यांच्या प्रतिप्रश्नाने त्यांना काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते व माझे तरी कुठे चुकले होते? सर्व सर्वसामान्य स्त्रीच्या मनांत या ...

अधिक वाचा →

साधनेचा महिमा

मी अभ्यासासाठी स. का. पाटील उद्यानात जात असे. बी कॉमच्या तिसऱ्या वर्गाला असल्यामुळे, अभ्यास सुध्दां बराच करावा लागत असे. असेच एके दिवशी अभ्यास करून उद्यानातून, मित्राबरोबर घरी परत असतांना, वेळ रात्रीची असल्यामुळे अचानक व अकारण जोरात भिती वाटू लागली, अगदी भीतीने गांगरून गेलो. त्यावेळी मला स्वत:वरील ताबा नष्ट होऊ लागल्यासारखे झाले. परत थोडया वेळाने मला जरा बरे वाटले व मी घरी परत फिरलो. परंतु दुसऱ्या दिवशी माझ्या खोलीत घरीच अभ्यासाला बसलो, पुस्तक हातात घेवून उघडले व वाचू लागलो. परंतु एकदोन ओळी वाचतांच, डोके गरगरल्यासारखे होऊन पुढे पुस्तक वाचवेनासे झाले, छाती पण धडधडू लागली, गॅलरीत पुस्तक घेवून उभा राहिलो पण तिथे सुध्दा तीच अवस्था डोके गरगरल्यासारखे होऊन छाती धडधडू लागली. या अवस्थेत उभा सुध्दा राहू शकत नव्हतो.

मला असे वादू लागले किं काही तरी आजार झाला आहे. म्हणून मी एका स्पेशलिस्ट ...

अधिक वाचा →

माझी पाठराखीण

दिनांक १६ जानेवारी १९८५ चा दिवस होता. घरच्या कामानिमित्त मी कोल्हापूरला गेलो होतो. परतीच्या रात्रीच्या कोल्हापूर बोरीवली गाडीने निघालो होतो. मी त्या सीटवर स्थानापन्न झालो. बरोबर सामान काहीच असें नव्हते. जसा आलो त्या प्रमाणे माघारी फिरलो. थंडीचे दिवस असूनसुध्दा उबदार असे माझ्याजवळ काहीच नव्हते. बसमध्ये सर्व लोक थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी मफलर, स्वेटर इ. तयारीनिशी बसले होते. गाडीने कोल्हापूर सोडून साधारण एक तास झाला असेल. थंडीची जाणीव होऊ लागली. मी मात्र असाच, एकंदरीत थंडीत कसा प्रवास करायचा हा विचार मनात चमकून गेला. थंडी पण कडाक्याची होतो. गार वारा अंगाला झोंबत होता. प्रत्येकाने गाडीच्या खिडक्या लावून घेतल्या होत्या. गाडीत झोपण्यापेक्षा आपण साधना करू असा मनात विचार केला. सीटवर माझ्या व्यतिरिक्त बाजूला कोणी नव्हते. इतरांना त्रास होण्याचा प्रश्न उदृभवत नव्हता. साधनेच्या तयारीनिशी मी सीटवर बसलो. सद्गुरूंचे स्मरण केले. थोडयाच अवधीत जाणीव झाली की माझे भोवती उबदार असे आवरण तयार ...

अधिक वाचा →

माईंना आलेले दैवी अनुभव

मला पांचवा महिना लागला होता व मला ताप येवू लागला. २ दिवस १०२ पर्यंत सबंध दिवस ताप असायचा. डॉ. मिस वगळ यांचे औषध चालू होते. माझी बहीण व मी डॉक्टरांकडून औषध आणायला जात होतो. परंतु तिसऱ्या दिवसानंतर तापामुळे माझ्यातले त्राणच नाहीसे झाले. आतां डॉक्टरच रोज घरी येऊन तपासून मला इंजेकशन व औषध देवू लागल्या. परंतु ताप उतरण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मी माइया पतींचा "पती" या नात्याने उल्लेख न करतां, "महाराज" असा उल्लेख करणार आहे. महाराज रोज आपले नित्य नैमित्तिक आटोपून माझ्या आजाराविषयी माइया जवळ चौकशी करून व औषधे घेण्याचा ब तापमान नोंद करून ठेवण्याच्या सूचना देऊन कामावर निघून जात. संध्याकाळी परत आल्यावर शांताने (म्हणजे माझ्या बहिणीने) लिहिलेले २ तासांच्या अंतराने मापलेल्या तापाची नोंद ते पहात असत. आतां रोज ताप २ ते ३ पर्यंत चढत असे व कमीत कमी दोन पर्यंत येत असे. औषधाचा गुण काही पडत नव्हता. माझे मन मात्र घाबरू लागले. आपण या आजारांतून काही जगत नाही, असे वाटू लागले. मला वाईट ...

अधिक वाचा →