बाबांकडून दीक्षा देण्याची ईच्छा

बाबांकडून दीक्षा देण्याची ईच्छा

श्री गुरु शरणम

मला असे वाटत होते की माझ्या प्रमाणे सुद्धा माझ्या सुनेला देखील बाबानी दीक्षा द्यावी. माझ्या मुलाचे लग्न मे २००३ साली झाले. मी माझी हि इच्छा बाबांना सांगितली. आमच्या घरातील सर्वजणांनी बाबांकडून दीक्षा घेतली आहे. माझ्या सुनेला देखील तुमच्याकडून दीक्षा मिळावी. बाबा म्हणाले दीक्षा देण्याचा दिवस असेल त्यावेळी मी तुला सांगेन.

इथे विशेष गोस्ट सांगायची वाटते ती म्हणजे माझ्या सुनेची पहिली दिवाळी असल्यामुळे मुलगा आणि सून तिच्या माहेरी पुण्याला गेले होते. मी पण माझ्या आई बरोबर देवदर्शन करण्यासाठी गंगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर गेले होते. दीक्षा देण्याच्या दोन दिवस अगोदर माझी सून पुण्याहून आली. ज्या दिवशी मी मुंबईत सकाळी ०७.०० वाजता आले, ०९.०० वाजता श्री. मानेंचा फोने आला की उद्या दीक्षा देण्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही तुमच्या सुनेला उद्या गेहून या. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सुनेला घेऊन गेले. बाबांनी तिला दीक्षा दिली. ह्या कार्यक्रमानंतर बाबा लगेच आजारी पडले. दीक्षा देण्याचा हा त्यांचा अखेरचा कार्यक्रम होता.

तेव्हापासून माझ्या मनात सतत विचार येतो की, पल्लवी (सून) लवकर मुंबईला आली नसती तर, माझी तिला बाबांकडून दीक्षा देण्याची ईच्छा पूर्ण नसती झाली. पण बाबांनी माझी कोणतीही ईच्छा पूर्ण केली नाही असे कधीच घडले नाही. तिला महेर हुन लवकर येण्याची व मलाही देवदर्शन घेऊन पंढरपूर, तुळजापूर हुन लवकर येण्याची ओढ बाबांमुळेच झाली.