बाबांकडून शक्तिपात दिक्षा

बाबांकडून शक्तिपात दिक्षा

श्री गुरु शरणम

मी रमेश आंब्रे, श्री बाबांकडून शक्तिपात दिक्षा घेतल्यापासून त्यांच्या कडे माझे नियमीत जाणे येणे होते, दर गुरुवारी बाबांच्याकडे जाऊन त्यांचे दर्शन घेऊनच मी गोरेगावला माझ्या कारखान्यात जातं असे, काही कालावधी नंतर बाबा आजारी झाले, त्यांना हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये ठेवले होते, त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी तेथे गेलो, तेथे बाबांना पाहण्यासाठी बरीच गर्दी लोटली होती, त्यामुळे मला बाबांच्या जवळ जाता आलं नाही, मी त्यांना बाहेरूनच नमस्कार करून गोरेगावला कारखान्यात जाण्यासाठी निघालो, नमस्कार करत असतानाच वातावरणात मला एकदम सुगंध जाणवला, तो सुगंध मी गोरेगाव ला जाईपर्यंत होता.

मी माझा कारखाना भागीदारीत चालवत होतो, परंतु असंख्य अडचणी भागीदारीत निर्माण झाल्या होत्या, बाबांच्या मार्गदर्शनामुळे अडचणींचे निवारण झाले. आता सुद्धा बाबांच्या अनेक अनुभवांनी आमचे जीवन समृद्ध होत आहे, माझ्या गुरुमाऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम.